Jump to content

वीर (पुरंदर)

  ?वीर

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरपुरंदर
जिल्हापुणे जिल्हा
भाषामराठी
सरपंचश्री.ज्ञानेश्वर कोंडीबा वचकल
बोलीभाषामराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४१२३१२
• +०२११५
• एमएच/ १२

वीर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे.. हे गाव पुणे जिल्ह्यातील दक्षिण सीमेवरील शेवटचे गाव आहे. येथे असणाऱ्या श्रीविरेश्वर या पांडवकालीन शिव मंदिरामुळे गावाला वीर हे नाव मिळाले आहे.

भौगोलिक स्थान

महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात वीर हे गाव आहे. हे गाव पुणे जिल्याच्या दक्षिण सीमेवरील शेवटचे गाव आहे. येथून पुढे सातारा जिल्ह्याची हद्द लागते. वीर गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे ६० कि.मी. अंतरावर आहे. वीर गावापासून पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण सासवड २५ कि.मी. अंतरावर आहे.

  • गावच्या चतुर्सीमा:-
  • पूर्व - लपतळवाडी , मांडकी (ता.पुरंदर)
  • पश्चिम - तोंडल (ता.पुरंदर) ,
  • वायव्य - माहूर- शिरसटवाडी(ता.पुरंदर)
  • उत्तर - परिंचे (राऊतवाडी) व नवलेवाडी (ता.पुरंदर)
  • ईशान्य - हरणी (ता.पुरंदर)
  • आग्नेय - वाठार बुद्रुक (ता.खंडाळा, जि.सातारा)
  • दक्षिण - होडी व भादे (ता.खंडाळा, जि.सातारा)
  • नैऋत्य - तोंडल (ता.खंडाळा, जि.सातारा) व गुणंद (ता.भोर)
  • गावाच्या दक्षिण सीमेवरून निरानदी वाहते. या नदीवर वीर धरण हे मध्यम जलप्रकल्प आहे.

गावातील उपविभाग

वीर गावठाण - वीर गावठाणाच्या मध्यवस्तीत चावडी चौक आहे. येथे श्रीमारूती मंदिर , गावची चावडी, गावकामगार तलाठी कार्यालय , ग्रामपंचायत कार्यालय, महाराष्ट्र बँक आहे. येथेच महाकाय असे पुरातन वडाचे झाड आहे त्याला भलामोठा पार बांधलेला असून त्यावरच श्री मरीमातेचे लहानसे मंदिर आहे.

चावडी चौक येथून उत्तरेकडे गुरवआळी सुरू होते. येथेच श्रीमसोबाचे मंदिर असून शेवटी पूर्णगंगेच्या नदीपात्रात मोठ्या बायांचे मंदिर आहे.

चावडी चौकाच्या दक्षिणेकडे कुुंभारआळी असून सुरुवातीलाच श्री जानाई देवी मंदिर आहे. या मंदिराच्या पूर्वेकडे दत्तआळीच्या शेवटी श्रीदत्त मंदिर आहे.

चावडी चौकाच्या पूर्वेकडे बाजारतळ व पुरातन अंधारचिंच आहे. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. पश्चिमेकडे मेन पेठ आहे, पेठेतच उत्तराभिमुख श्रीराम मंदिर आहे हीच पेठ पुढे धसाडेआळीत जाते. सुरुवातीलाच चौकातच उत्तराभिमुख असा सरदार धुमाळ यांचा वरला वाडा आहे. पुर्वाभिमुख असा महान श्रीनाथभक्त मालजी घुणे यांचा पुरातन वाडा आहे, तो सध्या भग्न अवस्थेत आहे, समोरच पश्चिमाभिमुख थिटे यांचा ब्राम्हणवाडा व धसाडे यांचा माळीवाडा आहे. याच्या शेजारुनच पुर्णगंगा वाहते. त्यावर घाट बांधलेला आहे. या डोहाला पायरीचा डोह म्हणतात, हाच गावचा जुना पाणवठा धसाडेआळीत शेवटी संतशिरोमणी श्री सावतामाळी महाराज यांचे मंदिर आहे.

श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर

गावात पूर्णगंगेच्या उत्तर तीरावर श्रीनाथ म्हस्कोबा पवित्र देवस्थान आहे. हे मंदिर दगडी बांधकाम असणारे 'देऊळवाडा' या भव्य प्राकारात असून पूर्वाभिमुख मंदिराची सदर, सभामंडप, गाभारा अशी रचना केलेली आहे. मंदिराच्या चहुबाजूने उंच असा चिरेबंदी तट असून पूर्व व दक्षिण अशी दोन महाद्वारे आहेत. गाभाऱ्यात श्रीनाथ -जोगेश्वरी आई यांच्या स्वयंभू मूर्ती आहेत. श्रीनाथ हे 'काशीचे कोतवाल कालभैरव तसेच 'सोनारीचे सिद्धभैरव' असून कमळाजी नामक भक्तामुळे वीर या ठिकाणी वास्तव्यास आले आहेत. हा देव स्मशानभूमीत प्रगट झाल्याने यांना "म्हस्कोबा" असे नाव मिळाले आहे.

  • माळवाडी -

माळवाडी वीर गावच्या मधून वाहणाऱ्या पूर्णगंगेच्या उत्तर बाजूच्या टेकडीवर श्रीनाथ म्हस्कोबा मंदिराच्या डावीकडे वसलेली आहे. माळवाडीची सुरुवात भक्त कमळाजी मंदिर व नगारखाना येथून होते. पुढे गेल्यावर टपाल कार्यालय (पोस्ट ऑफिस) आहे. या भागातील लोकसंख्या दाट असुन बहुसंख्य माळीधनगर समाजाचे लोक येथे राहतात. येथेही श्रीसंतशिरोमणी सावतामाळी महाराज मंदिर व श्रीमहालक्ष्मी मंदिर आहे.

  • सुकापुरी - सुकापुरीची सुरुवात पूरातन अशा श्रीविरेश्वर मंदिरापासून होते, तसेच कुंभारआळीतून दक्षिणेकडे पुढे गेल्यावर वीर-सारोळा रस्ता ओलांडल्यावर सुकापुरी भाग सुरू होतो, येथेच श्रीलक्ष्मीआई मंदिर आहे. आषाढ महिन्यात या देवीचा वार्षिक उत्सव असतो.
  • समगिरवाडी (खालची)
  • समगिरवाडी (वरची)
  • चवरेवस्ती
  • कुरपडवस्ती
  • धसाडेवस्ती
  • हरिजनवस्ती
  • नाईकवाडा
  • भिसेवाडी
  • बनकरवाडी
  • धुमाळवाडी

हवामान

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

  • वीर गावात पोस्ट ऑफिस आहे.
  • वीर गावचा पिन कोड ४१२३१२ हा आहे.
  • दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा वीर गावात आहे.
  • श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर, ग्रामपंचायत वीर व समस्त वीर पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या विनंतीस मान्यता मिळाल्याने दि ०१ फेब्रुवारी २०२२ पासून हडपसर-सासवड़-वीर अशी पुणे महानगर परिवहन महामंडळाची (PMPML) बससेवा सूरु झाली होती.पण आता ती बंद आहे.
  • राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वीरच्या पश्चिममेला १७ किमी अंतरावर सारोळा येथुन जातो.
  • वीर राज्यमार्गा जवळ आहे. रा.मा. १३० (पुणे-कोंढवा-सासवड-वीर) गावातूनच जातो.
  • वीर गावात बँक आफ महाराष्ट्र ही राष्ट्रीयकृत (नॅशनल) बँक आहे.
  • वीर गावात विविध कार्यकारी सोसायटी (विकास) आहेत.
  • वीर गावात बचत गट आहेत.
  • वीर गावात दर शनिवारी आठवडे बाजार भरतो.
  • वीर गावात सार्वजनिक वाचनालय आहे.

जवळपासची गावे

परिंचे , हरणी , लपतळवाडी , मांडकी , वाठार बुद्रुक , भादे , तोंडल , माहूर

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate