Jump to content

वीर प्रकारच्या कॉर्व्हेट

वीर प्रकारच्या कॉर्व्हेट भारतीय आरमाराच्या युद्धनौकांचा ताफा आहे. या नौकांची बांधणी सोव्हिएत आरमाराच्या टारांटुल प्रकारावर आधारित आहे.[][] हा ताफा २२व्या घातक क्षेपणास्त्र नौका स्क्वॉड्रनचा भाग आहेत. []

भारतीय आरमाराने या प्रकारच्या १३ नौका सेवेत घेतल्या तर इतर दोन नौकांची मागणी रद्द केली. २०२२मध्ये या प्रकारच्या ११ कॉर्व्हेट सेवारत आहेत तर आयएनएस वीर आणि आयएनएस. निपात यांना २०१६मध्ये निवृत्ती देण्यात आली.

या १३ पैकी आठ नौकांनी २५व्या घातक क्षेपणास्त्र नौका स्क्वॉड्रनमधील जुन्या नौकांचे नाव देण्यात आले आहे, ज्यांनी १९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या दोन विनाशिका, एक सुरूंगपेरक जहाज आणि इतर अनेक रसदी नौकांना जलसमाधी दिली होती.[]

नौका

नाव ध्वज बांधणी सुरुवात जलावतरण सेवारत ठाणे निवृत्ती सद्यस्थिती
आयएनएस वीर के४० व्होलोदार्स्की, रायबिन्स्क, सोव्हिएत रशिया १९८४ ऑक्टोबर १९८६ २६ मार्च, १९८७[]मुंबई२८ एप्रिल, २०१६[]निवृत्त
आयएनएस निर्भिक के४१ व्होलोदार्स्की, रायबिन्स्क, सोव्हिएत रशिया १९८५ ऑक्टोबर, १९८७ २१ डिसेंबर, १९८७[]मुंबई११ जानेवारी, २०१८[]निवृत्त
आयएनएस निपात के४२ व्होलोदार्स्की, रायबिन्स्क, सोव्हिएत रशिया १९८६ नोव्हेंबर, १९८८ ५ डिसेंबर, १९८८[]पोर्ट ब्लेर२८ एप्रिल, २०१६[]निवृत्त
आयएनएस निशंक के४३ व्होलोदार्स्की, रायबिन्स्क, सोव्हिएत रशिया १९८७ जून, १९८९ २ सप्टेंबर, १९८९[]कोची सेवारत
आयएनएस निर्घात के४४ व्होलोदार्स्की, रायबिन्स्क, सोव्हिएत रशिया १९८८ मार्च, १९९० ४ जून, १९९०[]मुंबई११ जानेवारी, २०१८[]निवृत्त
आयएनएस विभूती के४५ माझगांव डॉक लिमिटेड २७ सप्टेंबर, १९८७ २६ एप्रिल, १९९० ३ जून, १९९१[]मुंबईसेवारत
आयएनएस विपुल के४६ माझगांव डॉक लिमिटेड २९ फेब्रुवारी, १९८८ ४ जानेवारी, १९९१ १६ मार्च, १९९२[]मुंबईसेवारत
आयएनएस विनाश के४७ गोवा शिपयार्ड लिमिटेड ३० जानेवारी, १९८९ २४ जानेवारी, १९९२ २० नोव्हेंबर, १९९३[]मुंबईसेवारत
आयएनएस विद्युतके४८ गोवा शिपयार्ड लिमिटेड २७ मे, १९९० १२ डिसेंबर, १९९२ १६ जानेवारी, १९९५[]कोची सेवारत
आयएनएस नाशक के८३ माझगांव डॉक लिमिटेड २१ जानेवारी, १९९१ १२ नोव्हेंबर, १९९३ २९ डिसेंबर, १९९४[]पोर्ट ब्लेरसेवारत
आयएनएस प्रहार के९७ गोवा शिपयार्ड लिमिटेड २८ ऑगस्ट, १९९२ २६ ऑगस्ट, १९९५ १ मार्च, १९९७[]मुंबई२२ एप्रिल, २००६ रोजी धडक बसून जलसमाधी
आयएनएस प्रबळ के९२ माझगांव डॉक लिमिटेड ३१ ऑगस्ट, १९९८ २८ सप्टेंबर, २००० ११ एप्रिल, २००२[]मुंबईसेवारत
आयएनएस प्रलय के९१ गोवा शिपयार्ड लिमिटेड १४ नोव्हेंबर, १९९८ १४ डिसेंबर, २००० १८ डिसेंबर, २००२[]मुंबईसेवारत

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Indian Naval Ships-Corvettes-Veer Class Archived 19 June 2009 at the Wayback Machine.
  2. ^ [१][permanent dead link]
  3. ^ Indian Navy Celebrates `Killers Nite' Archived 9 June 2010 at the Wayback Machine.
  4. ^ Commodore Stephen Saunders, ed. (2005). "India". Jane's Fighting Ships 2005-2006 (108th ed.). Coulsdon: Jane's Information Group. p. 323. ISBN 0710626924.
  5. ^ a b c d e f g h i j k l m चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; jfs-0506 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  6. ^ a b "Indian Naval Ships Veer and Nipat decommissioned on 28 Apr 2016". indiannavy.nic.in. 29 April 2016.
  7. ^ a b Pandey, Munish Chandra (12 January 2018). "After serving country for three decades, आयएनएस Nirbhik and Nirghat decommissioned". India Today.