वीरांगना लक्ष्मीबाई झाशी रेल्वे स्थानक
वीरांगना लक्ष्मीबाई झाशी रेल्वे स्थानक भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
वीरांगना लक्ष्मीबाई झाशी रेल्वे स्थानक इमारत | |
स्थानक तपशील | |
पत्ता | झाशी, झाशी जिल्हा, उत्तर प्रदेश |
गुणक | 25°26′40″N 78°33′12″E / 25.44444°N 78.55333°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | २५९ मी |
मार्ग | दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग झाशी-कानपूर मार्ग |
फलाट | ७ |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १८८० |
विद्युतीकरण | होय |
संकेत | VGLJ |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | उत्तर मध्य रेल्वे |
स्थान | |
झाशी |
वीरांगना लक्ष्मीबाई झाशी रेल्वे स्थानक (VGLJ), (पूर्वीचे नाव:झांसी जंक्शन रेल्वे स्थानक (JHS)) हे उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड प्रांतातील झाशी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक व भारतीय रेल्वेच्या उत्तर मध्य रेल्वे क्षेत्राच्या झाशी विभागाचे मुख्यालय आहे. झाशी भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून नवी दिल्ली व उत्तरेकडून दक्षिण भारताकडे धावणाऱ्या सर्व गाड्या झाशीमार्गेच जातात. १ जानेवारी २०२२ रोजी उत्तर प्रदेश सरकारने स्थानकाला झाशीच्या पराक्रमी साम्राज्ञी भारतीय स्वातंत्र्यदेवता वीरांगना महाराणी लक्ष्मीबाईसाहेब नेवाळकर यांचे नाव देऊन स्थानकाला सन्मानित केले.