Jump to content

वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था

वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था
व्ही.जे.टी.आय. चे बोधचिन्ह
President डॉ. एम्. सी. देव
पदवी ३,०००
स्नातकोत्तर १,०००
Campus शहरी, १७ एकर



व्ही.जे.टी.आय. - Victoria Jubily Technical Insftute - बदललेले नाव - वीरमाता जिजाबाई टेक्नॉलोजिकल इन्स्टिट्यूट ही मुंबईतील एक प्रमुख अभियांत्रिकी शिक्षण संस्था आहे. हे महाविद्यालय मुंबईतील सर्वात जुने अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. याची स्थापना १८८७मध्ये झाली. तेव्हा व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेचे नाव २६ जानेवारी, १९९७ रोजी बदलले गेले. व्हीजेटीआय ही शैक्षणिक व प्रशासकीय स्वायत्त संस्था आहे, परंतु ती मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. या संस्थेला महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक साहाय्य आहे.

२००४ मध्ये शैक्षणिक व प्रशासकीय स्वायत्तता मिळाल्यानंतर व्हीजेटीआय प्रशासक मंडळाच्या कारभारात कार्यरत झाले. व्हीजेटीआय ही महाराष्ट्र राज्याची केंद्रीय तंत्रज्ञान संस्था आहे. संस्था प्रमाणपत्र,डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट स्तरावर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान प्रशिक्षण देते.

इतिहास

पाया आणि प्रारंभिक वर्षे

VJTI प्रवेश द्वार

१८८७ साली मुंबई विभागाच्या तंत्रकुशल मनुष्यबळाच्या गरजा भागवण्यासाठी इंग्रजांनी या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीस सर जे. जे. स्कूल ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि रिपन टेक्सटाईल स्कूल हे दोन विभाग होते.

संस्थेच्या विस्ताराची पहिली पायरी १९०३ मध्ये घेण्यात आली जेव्हा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम सुरू झाले. १९०३ मध्ये तांत्रिक आणि उपयोजित रसायनशास्त्र विभाग जोडला गेला. २७ जून १९१३ मध्ये जी. आर. नं. १८५० नुसार, संस्थेस केंद्रीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई प्रांत) म्हणून मुंबई सरकारने मान्यता दिली. सुरुवातीच्या काळात, सर दिनशा माणकेजी पेटिट यांनी दान केलेल्या भायखळा येथील इमारतीत संस्था होती. विकासाच्या काळात, भायखळा येथील संस्थेची इमारत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येपुढे अपुरी ठरली आणि लवकरच १९२३मध्ये पहिल्या महायुद्धाच्या नंतर संस्था माटुंगा येथील सध्याच्या आणि अधिक खास बांधकाम केलेल्या इमारतीत गेली. संस्थेच्या इतिहासातील ही सर्वात महत्त्वाची घटना. हे शक्य झाले केवळ सरकार आणि बॉम्बे मिलवेवर्स असोसिएशनने दिलेल्या उदार मदतीमुळे. १९३१ मध्ये सर नेस वाडिया यांच्या कार्यालयांतून कापडांची यंत्रसामग्री व उपकरणे ठेवण्यासाठी संस्थेत नॉर्दर्न लाइट छप्पर प्रकारच्या बांधकामाचा नवीन ब्लॉक जोडला गेला.

वस्त्रोद्योग, मेकॅनिकल अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मधील पदवी अभ्यासक्रम अनुक्रमे १९४६, १९४७ आणि १९४९ मध्ये सुरू झाले. दरम्यान, संस्था मुंबई विद्यापीठाशी संलग्न झाली आणि अनुदानासह पुढील विकासासाठी केंद्र सरकारने निवडलेल्या १४ संस्थांपैकी एक संस्था बनली.

१९६० पूर्वी मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत अभियांत्रिकी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवणारी व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट ही एकमेव संस्था होती. ही संस्था पूर्णतः स्वायत्त होती. नवीन अभ्यासक्रम सुरू करणे, त्यांचा अभ्यासक्रम तयार करणे आणि विद्यापीठ पातळीवरील त्यांच्या परीक्षा योजना यासारख्या अभ्यासक्रमांच्या विकासामध्ये व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटने खूप मोलाची भूमिका बजावली आहे.

१९९ मध्ये, संस्थेचे नाव जुने प्रचलित आणि लोकप्रिय नाव व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट हे बदलून 'वीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजिकल इन्स्टिट्यूट' असे केले.

विभाग

महाविद्यालयात सध्या अभियांत्रिकीच्या खालील शाखांमध्ये बी. टेक. (बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी) ही पदवी मिळवता येते.

ठिकाण

ही संस्था मुंबईतील माटुंगा भागात आहे. वडाळा रोड हे जवळचे रेल्वे स्थानक आहे.

बाह्य दुवे