वीरचा धबधबा
चिपळूण तालुक्यातील तुरंबव येथून आबलोलीकडे जाताना दहा किलोमीटर अंतरावरील वहाळ हे गाव आहे. तेथून दहा किलोमीटर अंतरावर वीर नावाचे मच्छीमारी बंदर आहे. त्या गावात देवपाटचा बारमाही धबधबा आहे. हा धबधबा काळ्या कातळातून दोन टप्प्यांत डोहात कोसळतो. पोफळीच्या दाट रांगांच्या बाजूला असणाऱ्या या धबधब्याचे सौंदर्य काही वेगळेच आहे. धबधब्यापर्यंत जाणारा रस्ता दाट झाडीतून जातो.