Jump to content

वीजेचे भारनियमन

प्रत्यक्ष उत्पादनापेक्षा जेंव्हा मागणी जास्त असते (वीज टंचाई असते) तेंव्हा वीजेचे उत्पादन व पुरवठ्याचा मेळ साधण्यासाठी वीजेचे भारनियमन केल्या जाते. काही क्षेत्रात मग वीज पुरवठा बंद करण्यात येतो.येथे 'मागणी तसा पुरवठा' हे वाणीज्यिक सुत्र कुचकामी ठरते.

भारनियमनाची कारणे

चित्र:Netwerkfailure.gif
अचानक वीजेची मागणी वाढल्यामुळे वा तांत्रिक खराबीमुळे वीजनिर्मिती संचांवर ताण येउन ते कसे बंद पडतात हे दाखविणारे एक नमुना वीचित्र.
  • नैसर्गिक आपत्ती-((वादळ]],पूर,भूकंप याने उत्पादन व वितरण प्रणाली विस्कळीत होणे.
  • वीजेचे मागणीपेक्षा कमी उत्पादन.
  • तांत्रिक प्रणालीत उद्भवलेली नादुरुस्ती.
  • अचानक वीजेची मागणी वाढल्यामुळे वा तांत्रिक खराबीमुळे वीजनिर्मिती संचांवर ताण येउन ते बंद पडणे.
  • वीजनिर्मिती संचांची देखभाल व दुरुस्ती.
  • वीज संच चालण्यासाठी आवश्यक रसदेचा अपुरा पुरवठा-उदा. कोळसा,पाणी,नॅप्था,वायु,अणुउर्जा, कच्चे तेल इत्यादी.
  • वीजचोरी
  • वीज संवहन आहे व वीजगळती(वीज गळती १ टक्क्याने कमी झाल्यास सुमारे २५० कोटी रुपयाची बचत होते.)
  • वित्तपुरवठा
  • कामगारांचा प्रश्न
  • वीजेचा नियंत्रित वापर

भारनियमनाचे प्रकार

वादळामुळे वीजवाहक तारा एकमेकांस स्पर्षुन ठिणग्या उडतात व वीज-उपकरणे बंद पडुन वीजपुरवठा बंद होतो.

भारनियमनाचे साधारणतः खालील दोन प्रकार आहेत:

  • नियोजित (घोषित) भारनियमन
  • अघोषित भारनियमन

भारनियमनाने पडणारे प्रभाव

प्रत्यक्ष प्रभाव

ज्या ज्या ठिकाणी वीजचलीत उपकरणे आहेत ती चालु शकत नाही.

  • मानवांवर-मनस्ताप
  • घरघुती-मिक्सर,फ्रिज,दिवे,पाणीपुरवठ्याच्या मोटारी,उद्वाहक,संगणक,कुलर,वातानुकुलन यंत्र, ई.
  • औद्योगिक व व्यापार-सर्व प्रकारचे उद्योग ज्यात निर्मिती प्रक्रिया चालते त्या प्रक्रियेत खंड पडतो.जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्याचे धडपडीमुळे दर्जा घसरतो.पर्यायाने उत्पन्न कमी होते, तेवढ्याच मालासाठी जास्त उत्पादनखर्च.म्हणुन मालाच्या किंमतीत वाढ.वाढलेल्या किंमतीमुळे कमी विक्री.
  • काम नसल्यामुळे मनुष्यबळाचे तास वाया जातात.कमी रोजगारनिर्मिती.
  • सार्वजनिक-कामगारकपात.संप व निदर्शने.सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान.पथदिवे, पाणीपुरवठा योजना इत्यादींवर प्रभाव.

अप्रत्यक्ष प्रभाव

  • राष्ट्रावर वा राज्यांवर-
  • उत्पादनांवर-
  • वीजवापर वाढतो.-इन्व्हर्टर इत्यादी उपकरणे लावल्या जातात.त्यांचे चार्जिंगसाठी जास्तीची वीज वापरल्या जाते.अधिक खर्च येतो.

उपाययोजना

  • वीज उत्पादनाचे विकेंद्रीकरण व एकाधिकार संपविणे.चढाओढ निर्माण करणे.
  • अपारंपारिक उर्जेचे उत्पादन व वापर वाढविणे.
  • एकूण वीज उत्पादन वाढविणे.
  • अद्ययावत् तांत्रिक क्षमता निर्माण करणे.
  • भविष्यातील मागणी जोखुन नियोजन करणे.
  • आपत्कालीन परीस्थिती पूर्वीच जोखुन पर्यायी योजना आखणे व तयार असणे.
  • वीजक्षेत्र राजकारण विरहीत करणे.