वि.रा. ज्ञानसागर
प्रा. वि.रा. ज्ञानसागर (इ.स. १९१८ - इ.स. २०११) हे एक मराठी वनस्पतीशास्त्रज्ञ होते.
शिक्षण
त्यांचे शिक्षण नागपूरच्या कॉलेज ऑफ सायन्स येथे झाले. १९४२ साली नागपूर विद्यापीठातून ते एम.एस्सी झाले. त्या वेळी प्रथम वर्गात यॆऊन त्यांनी विद्यापीठात वनस्पतिशास्त्र या विषयात प्रथम स्थान मिळवले. पुढे त्याच विषयात ते पीएच.डी. झाले.
१९५७ ते १९५९ दरम्यान प्रो. ज्ञानसागर यांना परदेशात अभ्यास करण्यासाठी भारत सरकारची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. तेव्हा त्यांनी अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या जेनेटिक्स विभागात शोधकार्य केले आणि त्यांना प्रोफेसर डी. सी. कूपर यांच्या मार्गदर्शनाखाली भ्रूणशास्त्र आणि सायटालॉजी जेनेटिक्स या विषयात डॉक्टरेट मिळाली. या विषयावरचे त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पत्रिकांमधून अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.
प्रा. ज्ञानसागर यांनी वनस्पतिशास्त्रावर मराठीतून पुस्तके लिहिली, तसेच व्याख्यानेही दिली.
अध्यापन
- १९४६-१९७१ या काळात ज्ञानसागरांनी नागपूरला कॉलेज ऑफ सायन्समध्ये अध्यापन केले.
- १९५१-१९५६ या काळात त्यांनी ते रायपूर येथील कॉलेजात वनस्पतिशास्त्र विभागाची आखणी केली आणि विभागाला वैज्ञानिक साधनसामग्रीने परिपूर्ण केले.
- काही काळ अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात अध्यापन करून ज्ञानसागर १९६२ साली मुंबईतील कॉलेज ऑफ सायन्समध्ये वनस्पतिशास्त्र विभागात प्राध्यापक आणि नंतर विभागप्रमुख झाले. त्यांच्या तेथील वास्तव्यात वनस्पतिशास्त्र विभागात सायटालॉजी ॲन्ड जेनेटिक्स हा विषय एम.एस्सी.साठी नव्याने सुरू झाला.
- १९७१ साली स्वेच्छानिवृत्ती घेईपर्यंत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी भ्रूणशास्त्र आणि सायटालॉजी जेनेटिक्स या विषयांत मार्गदर्शन केले.
पुस्तके
- असे महान वृक्ष असे त्यांचे धाडसी शोध (साकेत प्रकाशन)
- Recent Trends and Contacts Between Cytogenetics Embryology and Morphology (सहलेखक - पी.के. देशपांडे) - १९७७
- Lichen Flora of Central India (२००६)
- विज्ञानाची वाटचाल (साकेत प्रकाशन)
- Cytology and Genetics (१९८७)
पुरस्कार आणि सन्मान
- इंडियन बॉटॅनिकल सोसायटीचे १९८० चे व्ही.पुरी सुवर्णपदक
- १९८१ साली झालेल्या इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्षपद
- १९८३ साली उदगीर तेथे झालेल्या मराठी विज्ञान परिषद संमेलनात त्यांना वनस्पतिशास्त्रामधील योगदानासाठी सन्मान
- महाराष्ट्र शासनाने मराठीमध्ये वनस्पतिशास्त्रविषयक शब्द सुचवण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष