विस्फोटक सामग्री
विस्फोटक सामग्री ज्यास 'विस्फोटक' ही असे नाव आहे, ही ती प्रक्रिया होणारी सामग्री असते ज्यात उच्च दर्जाची स्थितिज ऊर्जा असते. त्याचे विमोचन केले असता स्फोट होऊ शकतो. स्फोट झाल्यावर त्यासमवेतच प्रकाश,उष्णता आवाज व प्रचंड दाब निर्माण होतो.
विस्फोटक प्रभार हा एक निश्चित मोजणी केलेली विस्फोटक सामग्री असते. त्यात एकच घटक अथवा दोन अथवा जास्त घटक राहू शकतात. त्यात जमा असलेली ऊर्जा, उदाहरणार्थ, रासायनिक ऊर्जा जसे- नायट्रोग्लिसरीन , दाब दिलेला वायू, जसे-गॅस सिलेंडर अथवा एअरोसोल, किंवा आण्विक ऊर्जा जसे- युरेनियम-२३५ व प्लुटोनियम-२३९ अशी कोणतीही असू शकते.
विस्फोटक सामग्रीचे वर्गीकरण त्यांच्या प्रसरण पावण्याच्या गतीनुसार करण्यात येऊ शकते. ते पदार्थ जे अधिस्फोटीत होतात(डिटोनेट) (ज्यातील पुढच्या भागातील रासायनिक प्रक्रिया ही त्या पदार्थामधून, आवाजाच्या गतीपेक्षा जास्त गतीने सरकते), त्यांना 'उच्च विस्फोटक' समजल्या जाते. ते पदार्थ जे अति-जलद गतीने जळतात, त्यांना 'हलके विस्फोटक' समजल्या जाते.
विस्फोटकांना त्यांच्या संवेदनशिलतेनुसारही वर्गीकृत केल्या जाऊ शकते.केवळ छोट्याश्या आगीने/ठिणगीने अथवा दाबानेही जे उद्युक्त होतात, त्यांना 'प्राथमिक विस्फोटक' समजल्या जाते.ते पदार्थ जे अशा प्रकारच्या आगीस अथवा दाबास त्या अनुषंगाने कमी प्रमाणात प्रतिसाद देतात त्यांना 'दुय्यम विस्फोटक' समजल्या जाते.