Jump to content

विष्णु सदाशिव कोकजे

विष्णू सदाशिव कोकजे २००३ ते २००८ या काळात हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल होते.

त्यांचा जन्म ६ सप्टेंबर १९३९ या दिवशी मध्य प्रदेशात एका मराठी कुटुंबात झाला. १९६४ मध्ये इंदूर येथून विधीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९६४ साली वकीलीला आरंभ केला. २८ जुलै १९९० या दिवशी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी ११ महिने राजस्थान उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती म्हणून २००१ मध्ये काम केले. सप्टेंबर २००२ मध्ये त्यांना भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती मिळाली.

८ मे, २००३ रोजी ते हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आणि १९ जुलै २००८ पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. त्यांनी भारत विकास परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. १४ एप्रिल २०१८ रोजी विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राघव रेड्डी यांच्या विरुद्ध निवडणूक जिंकल्याने कोकजे यांची विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे.