Jump to content

विष्णु भिकाजी कोलते

विष्णु भिकाजी कोलते
जन्म नाव डॉ .विष्णू भिकाजी कोलते
जन्मजून २२, इ.स. १९०८
महाराष्ट्र, भारत
मृत्यूएप्रिल ८, इ.स. १९९८
नागपूर महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकार इतिहास, ऐतिहासिक साहित्य
विषय महानुभावीय मराठी साहित्य
वडील भिकाजी कोलते
पुरस्कारपद्मश्री पुरस्कार (इ.स. १९९१)

डॉ. विष्णू भिकाजी कोलते (जून २२, १९०८ - एप्रिल ८, १९९८) हे मराठी लेखक, महानुभाव साहित्याचे संशोधक व कवी होते. यांना इ.स. १९९१ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.[ संदर्भ हवा ]

जीवन

विष्णू भिकाजी कोलते यांचा जन्म २२ जून, इ.स. १९०८ रोजी नरवेल नावाच्या गावी झाला.[ संदर्भ हवा ] त्यांचे शालेय शिक्षण मलकापूर येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण खामगाव व नागपूर येथे झाले. इ.स. १९३० साली त्यांनी एम.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. इ.स. १९३१ ते इ.स. १९४४ या कालखंडात अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात, तर इ.स. १९४४ ते इ.स. १९६४ या कालखंडात नागपुरातील मॉरिस कॉलेजात त्यांनी मराठी विषय शिकवला.[ संदर्भ हवा ] इ.स. १९६६ ते इ.स. १९७२ या काळात ते नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते.[ संदर्भ हवा ] त्यांनी काव्य, नाटक, चरित्र, आत्मचरित्र या ललित साहित्य प्रकारांच्या क्षेत्रात आपली लेखणी चालविली. सोबतच अनेक ललित साहित्य कृतींचा आस्वाद घेऊन समीक्षालेखनही केले. संपादन आणि संशोधन कार्यात तर त्यांचे योगदान लक्षणीय आहे. प्राचीन शिलालेख, ताम्रपटांचे तसेच मध्ययुगीन मराठी साहित्याचे संपादन , संशोधन करून साहित्याच्या क्षेत्रात प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त केले आहे.[]

त्यांचे आत्मचरित्र अजुनी चालतोच वाट या नावाने इ.स. १९९४ साली प्रकाशित झाले.[ संदर्भ हवा ]

प्रकाशित साहित्य

लिखित साहित्य [ संदर्भ हवा ]

पुस्तकाचे नावप्रकाशन वर्ष (इ.स.)प्रकाशनसाहित्यप्रकारभाषा
अजुनी चालतोच वाटइ.स. १९९४अत्मचरित्रमराठी
गिरिपर्णइ.स. १९८९निबंधमालामराठी
चक्रधर : शेवटचे प्रकरणइ.स. १९८२संशोधनात्मकमराठी
श्री चक्रधरचरित्रग्रंथमराठी
प्राचीन मराठी साहित्य संशोधनइ.स. १९६८संशोधनात्मकमराठी
भास्कर भट्ट बोरीकर : चरित्र व काव्य विवेचनइ.स. १९३५संशोधनात्मकमराठी
मराठी अस्मितेचा शोधइ.स. १९८९संशोधनात्मकमराठी
मराठी संतों का सामाजिक कार्यइ.स. १९३५संशोधनात्मकहिंदी
महात्मा रावण (पुस्तिका)माहितीपरमराठी
महानुभाव आचारधर्मइ.स. १९४५संशोधनात्मकमराठी
महानुभाव तत्त्वज्ञानइ.स. १९४५संशोधनात्मकमराठी
महानुभाव संशोधन (खंड १ व २)इ.स. १९६२,
इ.स. १९६४
संशोधनात्मकमराठी
मूर्तिप्रकाश१९६२संपादित ग्रंथमराठी
लव्हाळीइ.स. १९२८काव्यसंग्रहमराठी
सैह्याद्री-माहात्म्यचरित्रात्मकमराठी
साहित्य संचारइ.स. १९६५निबंधमालामराठी
स्नेहबंधइ.स. १९९४निबंधमालामराठी
स्वस्तिकइ.स. १९३७काव्यसंग्रहमराठी

संपादित साहित्य

पुस्तकाचे नावप्रकाशन वर्ष (इ.स.)प्रकाशनसाहित्यप्रकारभाषा
उद्धव गीताइ.स. १९३५
स्थान पोथीइ.स. १९३७
मूर्तिप्रकाशइ.स. ????
रुक्मिणी स्वयंवरइ.स. १९४०
वाचाहरणइ.स. १९५३
शिशुपाल वधइ.स. १९६०
लीळाचरित्रइ.स. १९७८
श्री गोविंद प्रभूइ.स. १९९४

गौरव

संदर्भ

  1. ^ संपादक, तावरे, डॉ. स्नेहल (२००७). वैदर्भी प्रतिभा. पुणे: स्नेहवर्धन प्रकाशन. pp. १८१.

बाह्य दुवे