विश्वास मेहेंदळे
डॉ. विश्वास मेहेंदळे (१० जुलै १९३९ - ९ जानेवारी २०२३) हे एक मराठी लेखक, वृत्तनिवेदक, चरित्रकार आणि अभिनेते होते. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या संपादकीय लेखांवर संशोधनात्मक प्रबंध लिहून पीएच.डी. मिळवली होती. ते मीडिया या ज्ञानशाखेचे एक्सपर्ट समजले जातात. सातारा येथून प्रकाशित होणाऱ्या ’ऐक्य’ दैनिकाचे ते संपादक देखील होते.
पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये विश्वास मेहेंदळे यांनी काही काळ नोकरी केली. त्यांची मीडियासंबंधी कारकीर्द दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून सुरू झाली. ते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालक होते, पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे खातेप्रमुख होते. ’सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आणि कम्युनिकेशन’चे ते संस्थापक आहेत. ते नाट्यकलावंत आहेत आणि त्यांनी सुमारे १८ पुस्तके लिहिली आहेत.
विश्वास मेहेंदळे हे मराठी नाट्यसृष्टीचे भाष्यकार होते. ’मला भेटलेली माणसे’ हा एकपात्री लोकप्रिय कार्यक्रमही ते सादर करत असत.
विश्वास मेहेंदळे यांची भूमिका असलेली नाटके (कंसात- नाटकातली भूमिका)
- अग्निदिव्य (अप्पा)
- एकच प्याला
- एक तमाशा अच्छा खासा (प्रधान)
- खून पहावा करून
- जर असं घडलं तर (इन्स्पेक्टर)
- नांदा सौख्यभरे
- पंडित आता तरी शहाणे व्हा (पंडित)
- प्रेमा तुझा रंग कसा (प्रो. बल्लाळ)
- भावबंधन
- मगरूर (अण्णा)
- मृत्युंजय (शकुनी)
- लग्न ( भाई)
- शारदा
- सासूबाईंचं असंच असतं (सहस्रबुद्धे)
- स्पर्श (अप्पा)
- स्वरसम्राज्ञी (भैय्यासाब)
डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी लिहिलेली पुस्तके
- आपले पंतप्रधान
- आपले वैज्ञानिक
- ओली-सुकी
- इंदिरा गांधी व लीला गांधी
- केसरीकारांच्या पाच पिढ्या
- गांधी ते पटेल
- तुझी माझी जोडी
- नरम-गरम (कथासंग्रह)
- नाट्यद्वयी
- पंडितजी ते अटलजी
- भटाचा पोर (वैचारिक)
- मला भेटलेली माणसं
- मला माहीत असलेले शरद पवार (संपादित ग्रंथ)
- मीडिया
- यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण
- यशवंतराव ते अशोकराव
- यशवंतराव ते विलासराव
- राष्ट्रपती
- सरसंघचालक
सन्मान
- सृजन फाउंडेशनने महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पुण्यात १-३ ऑक्टोबर २०१० या काळात भरविलेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद डॉ.विश्वास मेहेंदळे यांचेकडे होते.
- अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषेच्या पुणे शाखेकडून ‘मधुकर टिल्लू स्मृती एकपात्री कलाकार’ पुरस्कार (२५-५-२०१७)