Jump to content

विश्वनाथ सत्यनारायण

विश्वनाथ सत्यनारायण
जन्म ६ ऑक्टोबर, इ.स. १८९५
नंदनूर, कृष्णा जिल्हा, आंध्रप्रदेश
मृत्यू १९ ऑक्टोबर, इ.स. १९७६
राष्ट्रीयत्वतेलुगू, भारतीय
भाषातेलुगू
साहित्य प्रकारकादंबरी, कविता
विषयरामायण
प्रसिद्ध साहित्यकृती वेयिपंगलु
मध्याकरलु
रामायण कल्पवृक्षमु
वडील शोभनाद्री
पत्नी पार्वतीदेवी
पुरस्कारज्ञानपीठ
साहित्य अकादमी
पद्मभूषण

विश्वनाथ सत्यनारायण (तेलुगू: విశ్వనాథ సత్యనారాయణ ; रोमन लिपी: Viswanatha Satyanarayana) (६ ऑक्टोबर, इ.स. १८९५ - १९ ऑक्टोबर, इ.स. १९७६) हे तेलुगू भाषेतील लेखक, कादंबरीकार होते. साहित्यिक योगदानाबद्दल यांना ज्ञानपीठ पुरस्कार []साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

जीवन

विश्वनाथ सत्यनारायण यांच्या वडिलांचे नाव शोभनाद्री आणि आईचे नाव पार्वतीदेवी असे होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच तर महाविद्यालयीन शिक्षण मछलीपटणमच्या नॅशनल कॉलेजमध्ये झाले. इ.स. १९२९ साली त्यांना मद्रास विद्यापीठाकडून संस्कृत विषयात पदव्युत्तर पदवी मिळाली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी लिखाणाला सुरुवात केली.

इतर

सत्यनारायणांनी लिहिलेल्या "वेयिपंगलु" या कादंबरीचा पी.व्ही. नरसिंहराव यांनी हिंदीत "सहस्रफण" या नावाने अनुवाद केला.

सन्मान

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b "ज्ञानपीठ पुरस्कारविजेते" (इंग्लिश भाषेत). 2018-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २ जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)