विशी
विशी हे शहर फ्रांसच्या मध्यात, आलीये या विभागात व आल्ये या नदीकाठी वसलेले असून फ्रांसच्या इतिहासात एक महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. २२ जून, इ.स. १९४० रोजी जर्मनी आणि फ्रांस मध्ये झालेल्या तहानुसार, राजधानी पॅरिसचे विकेंद्रीकरण करून विशी या शहराला राजकीय राजधानी म्हणून नेमले गेले. भौगोलिकदृष्ट्या विशी हे वाहतूक व संदेश वहनासाठी अत्यंत सोयीस्कर केंद्र होते. विशीमध्ये पाण्याचे प्रकार आढळतात. या पाण्यांमध्ये औषधी गुण असल्याने जगभरातील लोक आजारांपासून मुक्त व्हायला येथील खास याच हेतूने बांधलेल्या हॉटेल्स मध्ये येऊन या पाण्याने अंघोळ करतात, पाण्याचे औषधांसारखे भाग घेतात किंवा स्पामध्ये काही दिवस घालवतात. हे पाण्याचे प्रकार नैसर्गिक असून जमिनीतून येत असे व हेच पाणी थेट लोकांना दिले जाते. या पाण्यांमध्ये आतड्यांचे व पोटाचे विकार, हाडांचे व स्नायूंचे विकार ठीक करण्याचे घटक आहेत. हे पाण्याचे प्रकार विशीची ओळख आहेत. सौंदर्य प्रसाधनांचा खजिना या शहरात आहे व 'विशी' ही नावाजलेली कंपनी नुकतीच लॉरेआल पॅरिस या जगभरात प्रसिद्ध असलेल्या ब्रँडने विकत घेतली. विशी पॅस्टिल्स या अ ष्टभुजाकृतीत असलेल्या गोळ्या इथली खासियत आहेत.