विशाल निकम
विशाल निकम | |
---|---|
जन्म | १० फेब्रुवारी, १९९४ पुणे, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | दख्खनचा राजा जोतिबा साता जल्माच्या गाठी बिग बॉस मराठी ३ |
वडील | बाळासो निकम |
आई | विजया निकम |
विशाल निकम एक भारतीय अभिनेता, मॉडेल आणि जिम प्रशिक्षक आहे. तो प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करतो. तो मिथुन (२०१८) आणि धुमस (२०१९) चित्रपटांसाठी लोकप्रिय आहे. विशालने २०२१ मध्ये दूरचित्रवाणी रिॲलिटी शो बिग बॉस मराठी ३ मध्ये भाग घेतला होता.[१]
वैयक्तिक जीवन
विशालचा जन्म १० फेब्रुवारी १९९४ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे झाला आणि आता त्याचे वय २७ वर्षे आहे. त्याचे शालेय शिक्षण एनएसव्ही विद्यालय, देवीखिंडी, खानापूर येथे झाले. विशालने पुण्यातील बाबुराव घोलप महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. तो पुणे, महाराष्ट्रातील अभिनेता आणि मॉडेल आहे. सध्या तो देवीखिंडी, खानापूर, सांगली येथे राहतो.
कारकीर्द
विशालने २०१८ मध्ये 'मिथुन' या रोमँटिक चित्रपटातून त्याच्या कारकीर्दची सुरुवात केली. त्याने अमृता धोंगडे सोबत मिथुनची प्रमुख भूमिका साकारली होती. लगेच पुढच्या वर्षी २०१९ मध्ये शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'धुमस' या रोमान्स मराठी चित्रपटात त्याने तेजसिंहची भूमिका साकारली होती.
२०१९ मध्ये विशालने स्टार प्रवाहवर प्रसारित होणाऱ्या 'साता जल्माच्या गाठी' या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतून पदार्पण केले, त्यात युवराजची मुख्य भूमिका होती. ही एका खेड्यातील तरुण मुलाची आणि एका तरुण मुलीची प्रेमकथा होती. २०२० मध्ये स्टार प्रवाहवर प्रसारित झालेल्या 'दख्खनचा राजा जोतिबा' या मराठी दूरचित्रवाणी मालिकेत त्याने जोतिबाची भूमिका साकारली होती. अलीकडेच त्याने 'बिग बॉस मराठी ३' या मराठी दूरचित्रवाणी रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता आणि विजेतेपद मिळवले.[२]
चित्रपट
वर्ष | चित्रपट | भूमिका |
---|---|---|
२०१८ | मिथुन | मिथुन |
२०१९ | धुमस | तेजसिंह |
मालिका
वर्ष | मालिका | भूमिका | संदर्भ |
---|---|---|---|
२०१९-२० | साता जल्माच्या गाठी | युवराज | [३] |
२०२०-२१ | दख्खनचा राजा जोतिबा | जोतिबा | [४] |
२०२१ | जय भवानी जय शिवाजी | शिवा काशीद | [५] |
२०२१ | बिग बॉस मराठी ३ | स्पर्धक (विजेता) | [६] |
२०२२ | आई मायेचं कवच | मानसिंग | [७] |
संदर्भ
- ^ "Marathi Actor Vishal Nikam Requests Media Not to Link his Name With Anyone in Industry". News18 (इंग्रजी भाषेत). 2022-01-23 रोजी पाहिले.
- ^ "Bigg Boss Marathi 3 contestant Vishal Nikam: From fitness trainer to a popular TV actor, know everything about the actor - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-01-23 रोजी पाहिले.
- ^ "जीम ट्रेनर ते अभिनेता थक्क करणारा विशालचा प्रवास!". माय महानगर. 2022-01-23 रोजी पाहिले.
- ^ "'जोतिबा'ची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमचं सेटवरचं भन्नाट वर्कआऊट एकदा पाहाच". महाराष्ट्र टाइम्स. 2022-01-23 रोजी पाहिले.
- ^ "'इतिहास पुन्हा जिवंत करण्याची मोठी जबाबदारी', शिवा काशीद साकारण्याबद्दल विशाल निकम म्हणतो..." महाराष्ट्र टाइम्स. 2022-01-23 रोजी पाहिले.
- ^ "विशाल निकम 'बिग बॉस मराठी सिझन ३'चा महाविजेता, दिमाखात पार पडला महाअंतिम सोहळा". एबीपी माझा. 2022-01-23 रोजी पाहिले.
- ^ "BBM विजेता विशाल निकम झळकणार मालिकेत, साकारणार ही भूमिका". न्यूझ १८ लोकमत. 2022-03-23 रोजी पाहिले.