विवेकसिंधु
विवेकसिंधु (मराठी लेखनभेद: विवेकसिंधू) हा मराठी भाषेतील काव्यग्रंथापैकी एक असलेला ग्रंथ, मुकुंदराज या कवीने लिहिला. हरिहरनाथ यांचे शिष्य रघुनाथ यांनी त्यांच्या मुकुंदराज या शिष्यास निवडून त्यास 'मराठी समाजास दिशा देणारा ग्रंथ हवा' अशा अपेक्षेने ग्रंथ साकार करण्यास सांगितले. त्यांनी रघुनाथांच्या समाधिस्थळी म्हणजे अंभोरा(सध्याच्या नागपूर जिल्ह्यात) येथे बसून हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाची निर्मिती शा.श. १११० (म्हणजेच इसवी सन ११८८) सालातील असावी.[१] या ग्रंथात शंकराचार्यांच्या वेदान्तावर निरूपणात्मक विवेचन केले आहे. ग्रंथात एकूण अठरा अध्याय आहेत. हा ग्रंथ ओवी या छंदात रचला आहे. ओव्यांची संख्या १७०० आहे.
ओवी
“ | वेदशास्त्रांचा मथितार्थु । मऱ्हाटिया जोडे फलितार्थु । तरि चतुरीं परिमार्थु । कां नेघावा ॥१॥ | ” |
हे सुद्धा पहा
- जैतपाळ
- या लेखाचे चर्चापान
संदर्भ
- ^ शफी पठाण. "सासवडमध्ये तरी विवेकसिंधूला न्याय मिळेल?". ०३ जानेवारी,२०१४ रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काइव्हदिनांक=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काइव्हदुवा=
ignored (सहाय्य);|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)