विवियन (पेपर मारियो)
Paper Mario या मालिकेतील पात्र | |
तळटिपा |
---|
Vivian (ビビアン Bibian ) विवियन ही २००४ मधील पेपर-मारिओ द थाऊजंड-इयर डोर ह्या नाट्य-पात्र खेळातील काल्पनिक पात्र आहे . ती सुरुवातीला शत्रूच्या बाजूने असते , मात्र खेळाडूचे पात्र मारिओ जेव्हा तिची मदत करतो, तेव्हा ती खेळाडूच्या बाजूला येते. जपानी आणि युरोपियन भाषांच्या भाषांतरात तिला ट्रान्सजेंडर महिला म्हणण्यात आले आहे. इंग्रजी भाषेतील आवृत्तीमध्ये मात्र तिच्या ट्रान्सजेंडर असण्याचा उल्लेख काढून टाकण्यात आलेला आहे. विवियनला व्हिडिओ खेळातील सर्वोत्तम LGBTQ पात्र मानण्यात येते.
कल्पना आणि निर्मिती
विवियन ही भूत सदृश्य व्यक्ती आहे. ती रूपाने जांभळी असून, तिचे गुलाबी केस आहेत. तसेच हातात पांढरे हातमोजे आणि गुलाबी- पांढऱ्या पट्यांची टोपी ही तिची वेशभूषा आहे. तिच्याजवळ ज्वाळा हाताळण्याची आणि सावल्यांमध्ये लपण्याची शक्ती आहे. तिच्या मोठ्या बहिणी बेल्दाम व मॅरिलिन ह्या अनुक्रमे निळी आणि पिवळी टोपी घालतात, ज्यांचे आकार बदलत असतात. विवियन ट्रान्सजेंडर महिला आहे, पण तिची बहीण बेल्दाम तिला त्यावरून घालून पाडून बोलते आणि तिच्या लिंगाबाबत गल्लत करत विवियनवर भिन्नलिंगी पोषाखाचा आरोप करते.
मूळ जपानी आवृत्तीत विवियनचे वर्णन ट्रान्सजेंडर म्हणून न करता, मुलीसारखा दिसणारा मुलगा असे करण्यात आले आहे. हाच तपशील फ्रेंच आणि स्पॅनिश आवृत्यांमध्ये पुढे नेण्यात आला आहे. जेव्हा जर्मन आणि इंग्रजी आवृत्त्या आल्या तेव्हा मात्र तिच्या ट्रान्सजेंडर असल्याचा उल्लेख न करता, तिच्या बहिणीच्या ट्रान्सफोबियाचे रूपांतर दिसण्यावरील अपमानामध्ये करण्यात आले होते. पण इंग्रजी/जर्मनेतर आवृत्यांत विवियनला ट्रान्सजेंडर दाखवण्यात आले आहे. इटालियन आवृत्तीत तर ती स्वतःच्या ट्रान्स महिला असल्याचा अभिमान असल्याचे सांगते आणि लिंगबदलाचे समर्थन करते. ज्यातून तिच्या बहिणीच्या आरोपांवर उत्तर देते," माझ्या मुलगी बनण्यावर मला अभिमान आहे."साचा:Mario role-playing gamesसाचा:Mario franchise