विल ड्युरँट
विल्यम जेम्स विल ड्युरंट (५ नोव्हेंबर, १८८५:मॅसेच्युसेट्स, अमेरिका - ७ नोव्हेंबर, १९८१:लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया, अमेरिका) हे एक अमेरिकन इतिहासकार होते. हे आपल्या द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन या ११ खंडाच्या ग्रंथासाठी प्रसिद्ध आहेत. आपली पत्नी एरियल ड्युरँट यांच्या सोबत लिहिलेल्या या ग्रंथात पौर्वात्य आणि पाश्चात्य संस्कृतींचा इतिहास तपशीलवार लिहिलेला आहे. या ग्रंथाचे खंड १९३५ ते १९७५ दरम्यान प्रकाशित झाले. याशिवाय त्यांनी द स्टोरी ऑफ फिलॉसॉफी हा ग्रंध १९२६मध्ये प्रकाशित केला. हा ग्रंध तत्त्वज्ञान लोकप्रिय करण्यात मदत करणारे एक महत्त्वपूर्ण कार्य समजला जातो.
भारताबद्दलचे लिखाण
१९३०मध्ये ड्युरँट यांनी द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशनसाठी माहिती गोळा करण्यासाठी ब्रिटिश भारताला भेट दिली. येथील अतीव दारिद्र्य आणि उपासमारी पाहून त्यांना मोठा धक्का बसला होता. त्यांनी येथे भारताला जाणुनबुजून नागवे केले जात असल्याचे पाहिले व त्याबद्दल त्यांनी आपल्या लिखाण आणि संशोधनातून वेगळा वेळ काढून द केस फॉर इंडिया हा ग्रंथ लिहिला.[१] यात ड्युरँट लिहितात की ब्रिटनने भारत पादाक्रांत करणे म्हणजे एका व्यापारी कंपनीने (ईस्ट इंडिया कंपनी) उच्च प्रतीच्या संस्कृतीवर आक्रमण करून त्याचा नाश करणे हेच होय. या व्यापारी कंपनीला आपण कशाचा नाश करीत आहोत याची फिकिर नाही, जाणीव नाही आणि या लूटमारीत या कंपनीने कोणत्याही प्रकारचा नैतिक अडसर येऊ दिलेला नाही. चोरी, लाचखोरी आणि खूनखराबा करीत फक्त पैसा ओरबाडून काढताना कला आणि विद्यांकडे बेफिकिरी दाखवत जाळपोळ करीत आपल्या तलवारीखाली त्यांनी सगळा मुलुख बेचिराख केला आहे. यात एक संपूर्ण देश तात्पुरता अनागोंदी आणि दुर्बळ झालेला आहे. अनिर्बंध आणि बेकायदा लूटमारीला आता त्यांनी कायदेशीर स्वरूप दिलेले आहे आणि एकशे त्र्याहत्तर वर्षे हा जुलमी कारभार निर्दयपणे सतत देशाला टाचेखाली ठेवत आलेला आहे. [२]
निवडक पुस्तके
विल ड्युरंट ऑनलाइन येथे संपूर्ण ग्रंथसूची पहा [३]
- १९१७: तत्त्वज्ञान आणि सामाजिक समस्या न्यू यॉर्क: मॅकमिलन.
- १९२४: स्पिनोझासाठी मार्गदर्शक [लिटल ब्लू बुक, क्रमांक 520]. Girard, KA: Haldeman-Julius कंपनी.
- १९२६: द स्टोरी ऑफ फिलॉसॉफी . न्यू यॉर्क: सायमन आणि शूस्टर.
- १९२७: संक्रमण. न्यू यॉर्क: सायमन आणि शूस्टर.
- १९२९: द मॅन्शन्स ऑफ फिलॉसॉफी. न्यू यॉर्क: सायमन आणि शूस्टर. नंतर थोड्याशा सुधारणांसह द प्लेझर्स ऑफ फिलॉसॉफी म्हणून पुन्हा प्रकाशित झाले
- १९३०: द केस फॉर इंडिया. न्यू यॉर्क: सायमन आणि शूस्टर.
- १९३१: अमेरिकेसाठी एक कार्यक्रम: न्यू यॉर्क: सायमन आणि शुस्टर.
- १९३१: अॅडव्हेंचर्स इन जिनियस. न्यू यॉर्क: सायमन आणि शूस्टर.
- १९३१: अॅडव्हेंचर्स इन जिनियसमधून घेतलेले महान साहित्यिक. न्यू यॉर्क: गार्डन सिटी पब्लिशिंग कं.
- १९३३: रशियाची शोकांतिका: एका संक्षिप्त भेटीतील छाप. न्यू यॉर्क: सायमन आणि शूस्टर.
- १९३६: सभ्यतेचा पाया. न्यू यॉर्क: सायमन आणि शूस्टर.
- १९५३: द प्लेझर्स ऑफ फिलॉसॉफी. न्यू यॉर्क: सायमन आणि शूस्टर.
- १९६८: (एरियल ड्युरंटसह) इतिहासाचे धडे . न्यू यॉर्क: सायमन आणि शूस्टर.
- १९७०: (एरियल ड्युरंटसह) जीवनाचे स्पष्टीकरण. न्यू यॉर्क: सायमन आणि शूस्टर.
- १९७७: (एरियल ड्युरंटसह) दुहेरी आत्मचरित्र. न्यू यॉर्क: सायमन आणि शूस्टर.
- २००१: हिरोज ऑफ हिस्ट्री : ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन फ्रॉम एन्शियंट टाइम्स फ्रॉम द डॉन ऑफ द मॉडर्न एज. न्यू यॉर्क: सायमन आणि शूस्टर. वास्तविकपणे जॉन लिटल आणि इस्टेट ऑफ विल ड्युरंट यांनी कॉपीराइट केलेले.
- २००२: द ग्रेटेस्ट माइंड्स आणि आयडियाज ऑफ ऑल टाइम. न्यू यॉर्क: सायमन आणि शूस्टर.
- २००३: तत्त्वज्ञानाचे आमंत्रण: ज्ञानाच्या प्रेमावर निबंध आणि चर्चा. प्रोमिथिअन प्रेस.
- २००८: अॅडव्हेंचर्स इन फिलॉसॉफी. प्रोमिथिअन प्रेस.
संदर्भ
- ^ Tharoor, Shashi, (2019). Inglorious Empire: What the British Did to India. Minneapolis, Minnesota, Scribe Publications, pg. 1
- ^ Durant, Will, (1930). The Case for India, New York City, Simon & Schuster, p. 7
- ^ "Bibliography". February 10, 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.