Jump to content

विल्यम हॉवार्ड टाफ्ट

विल्यम हॉवार्ड टाफ्ट

सही विल्यम हॉवार्ड टाफ्टयांची सही

विल्यम हॉवार्ड टाफ्ट (इंग्लिश: William Howard Taft) (१५ सप्टेंबर, इ.स. १८५७ - ८ मार्च, इ.स. १९३०) हा अमेरिकेचा २७वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १९०९ ते ४ मार्च, इ.स. १९१३ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षीय कारकीर्द सरल्यावर इ.स. १९२१ ते इ.स. १९३० या कालखंडात हा अमेरिकेचा १०वा सरन्यायाधीश बनला. राष्ट्राध्यक्षपद व सरन्यायाधीशपद या दोन्ही पदांवर काम केलेला हा एकमेव अमेरिकन व्यक्ती आहे.

टाफ्ट याच्या अध्यक्षीय कार्यकाळात आंतरसंस्थानीय वाणिज्य आयोगाची घडी बसवण्यात आली, टपाल सेवेची कार्यक्षमता सुधारण्यात आली. टाफ्ट प्रशासनाच्या काळात अमेरिकन राज्यघटनेतील सोळावी घटनादुरुस्ती संमत करण्यात आली.

अध्यक्षपदावर नेमणूक होण्याअगोदर इ.स. १८९० साली टाफ्ट अमेरिकेचा सॉलिसिटर जनरल म्हणून नेमला गेला. विल्यम मॅककिन्लीच्या अध्यक्षीय राजवटीत त्याला फिलिपिन्साचे गव्हर्नर जनरलपदी नेमणूक मिळाली.

बाह्य दुवे

  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). 2009-01-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-27 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जानेवारी १२, २००८ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "विल्यम हॉवार्ड टाफ्ट: अ रिसोर्स गाइड (विल्यम हॉवार्ड टाफ्ट: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)