विल्यम हेन्री हॅरिसन
विल्यम हेन्री हॅरिसन | |
सही |
---|
विल्यम हेन्री हॅरिसन (इंग्लिश: William Henry Harrison ;) (९ फेब्रुवारी, इ.स. १७७३ - ४ एप्रिल, इ.स. १८४१) हा अमेरिकेचा नववा राष्ट्राध्यक्ष, राजकारणी व सैनिकी अधिकारी होता. तो अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या स्वातंत्र्यपूर्वकाळात जन्मलेला अंतिम, तर अध्यक्षपदावर असताना मरण पावलेला पहिला राष्ट्राध्यक्ष ठरला. ४ मार्च, इ.स. १८४१ साली अध्यक्षपदी बसलेल्या हॅरिसनाचा कार्यकाळ ४ एप्रिल, इ.स. १८४१ रोजी न्युमोनियामुळे मृत्यू ओढवल्यामुळे केवळ ३२ दिवस टिकला.
अध्यक्षीय कारकिर्दीआधी त्याने वायव्य प्रदेशाचे प्रादेशिक काँग्रेशीत प्रतिनिधित्व केले होते. तसेच इंडियाना प्रदेशाचा राज्यपाल व पुढे ओहायो संस्थानाचा काँग्रेस-प्रतिनिधी व सेनेटर या पदांवरही त्याने काम केले. त्याआधी अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात इ.स. १८११ साली अमेरिकन इंडियनांविरुद्ध लढलेल्या टिपेकनूच्या लढाईत व इ.स. १८१२ साली अमेरिकन इंडियन व ब्रिटिश फौजांच्या आघाडीविरुद्ध लढलेल्या थेम्स नदीकाठच्या मॉरेव्हियनाच्या लढाईत त्याने अमेरिकन फौजांचे यशस्वी नेतृत्व केले.
बाह्य दुवे
- "विल्यम हेन्री हॅरिसन याचा अल्पपरिचय" (इंग्लिश भाषेत). 2009-02-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-23 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- "विल्यम हेन्री हॅरिसन याचे किंवा याच्याबद्दल प्रकाशित साहित्य" (इंग्लिश भाषेत). 2012-08-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-23 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)