Jump to content

विल्यम स्लिम

फील्ड मार्शल विल्यम जोसेफ स्लिम, पहिला व्हायकाउंट स्लिम (६ ऑगस्ट, १८९१:बिशप्सटन, इंग्लंड - १४ डिसेंबर, १९७०:लंडन, इंग्लंड) हे ऑस्ट्रेलियाचे १३वे गव्हर्नर जनरल आणि ब्रिटिश लष्करातील सेनापती होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान यांनी १४व्या ब्रिटिश लष्करासह म्यानमारमध्ये लढाईत भाग घेतला होता. १९४४मध्ये झालेल्या कोहिमाच्या लढाईत त्यांनी निर्णायक भूमिका बजावली.