Jump to content

विल्यम शॅटनर

विल्यम शॅटनर (२२ मार्च, १९३१:माँत्रिआल, क्वेबेक, कॅनडा - हयात) हे केनेडियन अभिनेते, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी स्टार ट्रेक या दूरचित्रवाणी मालिकेत आणि चित्रपट शृंखलेत केलेल्या कॅप्टन जेम्स टी. कर्कच्या भूमिकेमुळे ते जगभर प्रसिद्ध झाले[]. त्यांनी स्टार ट्रेकचे कथानक लिहिण्यात योगदान दिले तसेच स्टार ट्रेकमध्ये अभिनत करताना आणि त्याच्याशी निगडीत असतानाच्या अनुभवांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. स्टार ट्रेकशिवाय त्यांनी एरप्लेन २, मिस कॉन्जेनियालिटी सह सुमारे वीस चित्रपट आणि बॉस्टन लीगल, फॉर द पीपल, टी.जे. हूकर, रेस्क्यू ९११ सह सुमारे तीस दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केलेले आहे.

संदर्भ आणि नोंदी