Jump to content

विलासराव देशमुख

विलासराव देशमुख

कार्यकाळ
१ नोव्हेंबर, इ.स. २००४ – ४ डिसेंबर, इ.स. २००८
मागील सुशीलकुमार शिंदे
पुढील अशोक चव्हाण
कार्यकाळ
१८ ऑक्टोबर, इ.स. १९९९ – १६ जानेवारी, इ.स. २००३
मागील नारायण राणे
पुढील सुशीलकुमार शिंदे

जन्म २६ मे, १९४५ (1945-05-26) (वय: ७९)
बाभळगाव लातूर जिल्हा
मृत्यू १४ ऑगस्ट इ.स. २०१२
चेन्नई
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

विलासराव दगडोजीराव देशमुख (मे २६, इ.स. १९४५ - १४ ऑगस्ट इ.स. २०१२) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. इ.स. १९७४ साली बाभळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे विलासराव १८ ऑक्टोबर, इ.स. १९९९ ते १६ जानेवारी, इ.स. २००३ व १ नोव्हेंबर, इ.स. २००४ ते ४ डिसेंबर, इ.स. २००८ या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. हिंदी चित्रपटांतील अभिनेता रितेश देशमुख हा त्यांचा पुत्र आहे.

कारकीर्द

विलासराव देशमुखांनी पुणे विद्यापीठातून बीएससी आणि नंतर कायद्याची पदवी घेतली. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी म्हणजे इ.स. १९७४ मध्ये ते बाभळगावचे सरपंच झाले. तुळजापूरच्या तुळजाभवानी देवी वर त्यांची खूप श्रद्धा होती आणि तुळजापूरचे तत्कालीन आमदार कै.साहेबराव हंगरगेकर यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. युवक काँग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समितीचा उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य असे करीत करीत ते इ.स. १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.

इ.स. १९८२ मध्ये बाबासाहेब भोसले यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद दिले. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून पाहिले नाही. पुढे इ.स. १९९५ पर्यंत काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण विलासराव सदैव मंत्रिमंडळात राहिले. शिक्षण, कृषि, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला.

१३ ऑक्टोबर, इ.स. १९९९ला विलासराव पहिल्यांदा आणि इ.स. २००४ च्या निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पण इ.स. २००८ साली मुंबई वर झालेल्या दहशतवादी हल्याने त्यांना आपले मुख्यमंत्री पद गमवावे लागले.

  • २६ मे, इ.स. १९४५
  • जन्मगावः बाभळगाव, लातूर
  • शिक्षणः बीएससी, बीए, एलएलबी
  • राजकीय प्रवासः इ.स. १९७४ बाभळगावचे सरपंच, इ.स. १९७४ ते ७९ सदस्य, उस्मानाबाद जिल्हा परिषद तसेच उपाध्यक्ष, लातूर तालुका पंचायत समिती.
  • इ.स. १९८०पासून इ.स. १९९५पर्यंत आमदार, इ.स. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव. पुन्हा इ.स. १९९९ ते इ.स. २००९पर्यंत आमदार.
  • इ.स. १९८२ ते इ.स. १९८५ दरम्यान राज्यमंत्री, ग्रामविकास, गृह, सामान्य प्रशासन, कृषी, परिवहन, शिक्षण, तंत्रशिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, माहिती व जनसंपर्क ही खात्यांचे मंत्रिपद.
  • इ.स. १९८६ ते इ.स. १९९५ या कालखंडात कॅबिनेट मंत्री. ग्रामविकास, कृषी, सहकार, दुग्धविकास व पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, शिक्षण आणि तंत्रशिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, परिवहन, संसदीय कार्य खात्यांचा कार्यभार .
  • १८ ऑक्टोबर, इ.स. १९९९ ते जानेवारी, इ.स. २००३ मुख्यमंत्रीपदाची पहिली टर्म .
  • ११ नोव्हेंबर इ.स. २००४ ते ७ डिसेंबर इ.स. २००८ मुख्यमंत्रीपदाची दुसरी टर्म .
  • ऑगस्ट २००९मध्ये राज्यसभेवर निवड
  • इ.स. २००९ ते इ.स. २०११ दरम्यान केंद्रीय अवजड उद्योग खात्याचे मंत्री
  • जानेवारी २०११ ते १२ जुलै २०११ ग्रामविकासमंत्री आणि पंचायत खात्याचा अतिरिक्त कार्यभार .
  • १२ जुलै २०११पासून विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री .
  • धिरज देशमुख

पराभव

इ.स. १९९५ साली शिवाजीराव कव्हेकर यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला. हा त्यांच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा हादरा होता. त्यानंतर काँग्रेसच्या बाहेर जाऊन शिवसेनेच्या मदतीने विधानपरिषदेवर येण्याचा त्यांचा प्रयत्नही फसला होता. पण पुढे दोनच वर्षात ९५ हजार मतांच्या फरकाने निवडून येऊन ते मुख्यमंत्री झाले.

आरोप आणि ताशेरे

  • मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत गंभीर नसल्याचा झालेला आरोप.
  • दिलीप सानंदा प्रकरणी उच्च न्यायालयाने ठोठावलेला दंड.
  • आदर्श प्रकरणी निर्माण झालेला संशय
  • सुभाष घई यांना जमीन देण्यावरून न्यायालयाने ओढलेले कडक ताशेरे

महाराष्ट्र राज्य शासनातील पदे आणि कार्यभार

मागील
नारायण राणे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
ऑक्टोबर १८, इ.स. १९९९ - जानेवारी १६, इ.स. २००३
पुढील
सुशीलकुमार शिंदे
मागील
सुशीलकुमार शिंदे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नोव्हेंबर १, इ.स. २००४ - डिसेंबर ८, इ.स. २००८
पुढील
अशोक चव्हाण


केंद शासनातील भूषवलेली पदे आणि कार्यभार

मागील
संतोष मोहन देव
भारी उद्योग आणि सार्वजनिक उद्योग मंत्री
२८ मे २००९ - १९ जानेवारी २०११
पुढील
प्रफुल्ल पटेल
मागील
सी पी. जोशी
ग्रामीण विकास मंत्री
१९ जानेवारी २०११ - १२ जुलै २०११
पुढील
जयराम रमेश
मागील
सी पी. जोशी
पंचायती राज मंत्री
१९ जानेवारी २०११-१२ जुलै २०११
पुढील
किशोर चंद्र देव
मागील
पवन कुमार बंसल
विज्ञान और प्रौद्योगिकी मंत्री
१२ जुलै २०११ - १४ ऑगस्ट २०१२
पुढील
वयलार रवि
मागील
पवन कुमार बंसल
पृथ्वी विज्ञान मंत्री
१२ जुलै २०११ - १४ ऑगस्ट २०१२
पुढील
वयलार रवि

इतर पदे आणि कार्यभार

मागील
शरद पवार
मुंबई क्रिकेट एसोसिएशन
१५ जुलै २०११ - १४ ऑगस्ट २,०१२
पुढील
रवी सावंत

मृत्यू

१४ ऑगस्ट इ.स. २०१२ रोजी भाप्रवेनुसार दुपारी ०१:३० मिनिटांनी त्यांचा यकृताच्या आजाराने चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटल येथे निधन झाले. त्यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती आणि यकृताचा कर्करोग (हेप्टोसेल्युलर कार्सिनोमा) झाल्याने यकृताला सूज आली होती.

विलासराव देशमुख यांच्यावर लातूर जिल्ह्यातील बाभळगाव ह्या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या १७ फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी अनेक राजकारणी, चित्रपट सृष्टीतील नामवंत आणि लाखो चाहत्यांचा समावेश होता. त्यांत पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, शरद पवार राज ठाकरे आणि अनेक मंत्री होते.

ग्रंथ

विलासराव देशमुखांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात शरद पवार यांच्या हस्ते ’आठवणीतील विलासराव’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

बाह्य दुवे