विमल मोरे
विमल दादासाहेब मोरे (माहेरच्या विमल नामदेव भोसले; २० सप्टेंबर, १९७०) या गोंधळी या भटक्या समाजातील भटक्या-विमुक्त चळवळीतील कार्यकर्त्या व लेखिका आहेत. त्या पुण्यात ९-२० ऑगस्ट २०१४ रोजी पार पडलेल्या, महाराष्ट्रातील पहिल्या विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.
महाविद्यालयीन शिक्षण न झालेल्या मोरे यांचे लिखाण गुलबर्गा, गोंडवाना, मुंबई आदी विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नेमेले गेले आहे.
त्यांचे पती दादासाहेब मोरे हे सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक आहेत.
पुस्तके
- तीन दगडाची चूल (आत्मकथन) (या पुस्तकाला दोनांहून अधिक पुरस्कार मिळाले)
- पालातील माणसं (ललित लेख संग्रह)
- ’पी.पी.लांगस्ट्रुम्फी भाग १ आणि २’ या (मूळ लेखक -आस्ट्रीड लिंडग्रेन) या उमा झमरमन यांनी इंग्रजीत अनुवादित केलेल्या पुस्तकाचे मराठी रूपांतर
पुरस्कार
- विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्षपद
- शाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार
- भि.ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारचा लक्ष्मीबाई टिळक राज्य पुरस्कार (२००१)
- लोकायत पुरस्कार