विमला पाटील
विमला पाटील (जन्मदिनांक अज्ञात; मुंबई, महाराष्ट्र - हयात) या भारतीय पत्रकार आहेत. फेमिना या स्त्रियांसाठीच्या पाक्षिकाच्या त्या पंचवीस वर्षे संपादिका होत्या. जीवनशैली, स्त्रियांचे प्रश्न, प्रवासवर्णने, नामवंतांच्या मुलाखती, कला व संस्कृती अशा विविध प्रकारचे त्यांनी लेखन केले आहे. ध्वनिप्रकाशाचे खेळ व दूरचित्रवाणी-रेडिओ-चित्रपट यांसाठी त्यांनी संहिता लिहिल्या आहेत. त्या कलाक्षेत्राशी निगडित कार्यक्रम आयोजित करतात.
विमला पाटील यांनी फेमिना पाक्षिकातर्फे भारतसुंदरी स्पर्धांचे संयोजन केले. वस्त्रे आणि हातमागाचे कापड यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी परदेशांत भारतीय फॅशन शो भरवले. त्यांनी खाद्यजत्राही आयोजल्या आहेत. त्यांनी पाककलेवर १२ पुस्तके लिहिली आहेत.