Jump to content

विभागीय परिषद

भारतातील विभागीय परिषद

विभागीय परिषदे हे भारतातील सल्लागार मंडळे आहेत. राज्यांमध्ये आंतरसहकार्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता भारतातील राज्यांना पाच विभागांमध्ये विभागलेले आहे. हे राज्य पुनर्रचना कायदा,१९५६ च्या भाग -३ च्या अंतर्गत तयार केले गेले .

या विभागीय परिषदांपैकी प्रत्येकाची सध्याची रचना खालीलप्रमाणे आहे: []

# नाव सदस्य राज्ये/केंद्रशासित प्रदेश मुख्यालय[]
१. उत्तर विभागीय परिषदचंदिगढ, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, पंजाब आणि राजस्थाननवी दिल्ली
२. दक्षिणी विभागीय परिषदआंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, पाँडिचेरी, तमिळनाडू, तेलंगण, अंदमान आणि निकोबार (आमंत्रित) आणि लक्षद्वीप (आमंत्रित) चेन्नई
३. मध्य विभागीय परिषदl छत्तीसगढ, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशअलाहाबाद
४. पूर्व विभागीय परिषदबिहार, झारखंड, ओरिसा, आणि पश्चिम बंगालकलकत्ता
५. पश्चिमी विभागीय परिषददादरा व नगर हवेली आणि दमण व दीव, गोवा, गुजरात, आणि महाराष्ट्रमुंबई
६. ईशान्य परिषदअरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुराशिलाँग

ईशान्येकडची राज्ये कोणत्याही विभागीय परिषदेखाली येत नाहीत. त्यांच्या विशेष अडचणी आणि त्यांचे प्रश्न १९७१ सालच्या ईशान्य परिषद कायद्याद्वारे तयार केलेल्या ईशान्य परिषद नावाच्या वैधानिक मंडळाद्वारे सोडविले जातात.[] या परिषदेत मूळत: आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड आणि त्रिपुरा यांचा समावेश होता ; नंतर सिक्कीम राज्याला देखील ईशान्य परिषद (दुरुस्ती) अधिनियम,२००२ नुसार २३ डिसेंबर २००२ रोजी अधिसूचित करण्यात आले.[]

अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप हे कोणत्याही विभागीय परिषदेचे सदस्य नाहीत.[] तथापि, ते सध्या दक्षिणी विभागीय परिषदेचे विशेष आमंत्रित आहेत.[]

हे सुद्धा पहा

  • भारतातील प्रशासकीय विभाग

संदर्भ

  1. ^ "Archived copy". 8 May 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 March 2012 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
  2. ^ M Laxmikanth (2020). Indian Polity (English भाषेत) (6th ed.). McGraw Hill Education (India) Private Limited. p. 15.5. ISBN 978-93-89538-47-2.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "Archived copy". 15 April 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 March 2012 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
  4. ^ "Zonal Council |". mha.nic.in. 26 October 2016 रोजी पाहिले.
  5. ^ http://interstatecouncil.nic.in/iscs/wp-content/uploads/2016/08/states_reorganisation_act.pdf
  6. ^ http://interstatecouncil.nic.in/iscs/wp-content/uploads/2017/02/COMPOSITION-OF-SOUTHERN-ZONAL-COUNCIL.pdf