विन्स्टन काउंटी, अलाबामा
हा लेख अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील विन्स्टन काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, विन्स्टन काउंटी (निःसंदिग्धीकरण).
विन्स्टन काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र डबल स्प्रिंग्ज येथे आहे.[१]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २३,५४० इतकी होती.[२]
विन्स्टन काउंटीची रचना १२ फेब्रुवारी, १८५० रोजी झाली. १८५८पर्यंत या काउंटीला हॅन्कॉक काउंटी असे नाव होते.[३] त्यानंतर या काउंटीला अलाबामाच्या गव्हर्नर जॉन ए. विन्स्टनचे नाव दिले गेले. अमेरिकन यादवी युद्धात अलाबामा अमेरिकेतून विभक्त होऊ पाहताना या काउंटीने विभक्त होण्यास विरोध केला.[४]
हे सुद्धा पहा
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
- ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. April 7, 2022 रोजी पाहिले.
- ^ "ACES Winston County Office" (links/history), Alabama Cooperative Extension System (ACES), 2007, webpage: ACES-Winston.
- ^ Andrews, Evan; ‘6 Unionist Strongholds in the South during the Civil War’