Jump to content

विनायक सदाशिव वाळिंबे

विनायक सदाशिव वाळिंबे
जन्म नाव विनायक सदाशिव वाळिंबे []
जन्मऑगस्ट ११, इ.स. १९२८
मृत्यू २२ फेब्रुवारी, इ.स. २०००[]
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
भाषामराठी
साहित्य प्रकारकादंबरी
विषयइतिहास
अपत्ये अभिजित वाळिंबे

विनायक सदाशिव वाळिंबे[] , अर्थात वि.स. वाळिंबे किंवा बाबा वाळिंबे (ऑगस्ट ११, इ.स. १९२८ - २२ फेब्रुवारी, इ.स. २०००[]) हे मराठी लेखक व पत्रकार होते. यांनी विशेषकरून ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. ते केसरी वृत्तपत्रात लिहिणारे एक पत्रकार होते.

जीवन

विनायक सदाशिव वाळिंबे यांचा जन्म ११ ऑगस्ट, इ.स. १९२८ रोजी झाला. त्यांना राजा, मनोहर असे दोघे भाऊ व द्वारका नावाची एक बहीण होती.

विद्यार्थिदशेत वाळिंबे पुण्यात वास्तव्यास होते. इ.स. १९४८ साली गांधीहत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातल्या सत्याग्रहात वाळिंब्यांनी सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना तीन महिने येरवडा कारागृहात बंदी ठेवण्यात आले होते []. या घडामोडींमध्ये त्यांचे शिक्षण खंडले. लवकरच ते प्रभात वृत्तपत्रामध्ये नोकरीवर रुजू झाले []. प्रभात वृत्तपत्रानंतर ते ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रात काही काळ नोकरीस होते. इ.स. १९६२-६३ च्या सुमारास वाळिंबे केसरी वृत्तपत्रात वृत्तसंपादक म्हणून रुजू झाले[]. केसरीत असताना पत्रकारितेच्या प्रशिक्षणासाठी ते कार्डिफ येथे गेले होते.

वाळिंबे यांनी अनेकांची चरित्रे लिहिली त्यांपैकी राजमाता (विजयाराजे शिंदे यांचे आत्मकथन), व युवराज (रणजितसिंग यांचा मुलगा दुलिपसिंग याच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी) विशेष उल्लेखनीय आहेत.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
१८५७ची संग्राम गाथाअभिजित प्रकाशन
अरुण शोरी निवडक लेखअनुवादितअभिजित प्रकाशन
आज इथे : उद्या तिथेमेहता प्रकाशन
इंदिरा गांधींचे साथीदार? प्रकाशन
ऑपरेशन थंडरअभिजित प्रकाशन
इंदिरा गांधी बंगलोर ते रायबरेलीअभिजित प्रकाशन
इंदिराजीआउवादित, मूळ लेखक भगवानदासअभिजित प्रकाशन
इन जेलअनुवादित (मूळ लेखक कुलदीप नायर)अभिजित प्रकाशन
इस्रायलचा वज्रप्रहारपद्मगंधा प्रकाशन
१९४७अक्षरधारा प्रकाशन
१९४७ ते दुसरे महायुद्धमॅजेस्टिक प्रकाशन
एडविना आणि नेहरूमेहता प्रकाशन
ऑपरेशन थंडरअभिजित प्रकाशन
कथा ही दिवावादळाचीअनुवादित, मूळ लेखक अनंत सिंगमेहता प्रकाशन
गरुडझेपऐतिहासिकअभिजित प्रकाशन
जय हिंद आजाद हिंदऐतिहासिक कादंबरीमेहता प्रकाशन
तारका? प्रकाशन
तीन युद्धकथास्वाती प्रकाशन
द वर्ल्ड ऑफ कपिल देवअनुवादितअभिजित प्रकाशन
दुसरे महायुद्धअभिजित प्रकाशन
नेताजीऐतिहासिकमेहता प्रकाशन
पराजित-अपराजितमॅजेस्टिक प्रकाशन
फसलेला क्षणमेहता प्रकाशन
बंगलोर ते रायबरेलीश्रीविद्या प्रकाशन
बासष्टचे गुन्हेगारकुलस्वामिनी प्रकाशन
भारत १९४७ पूर्वी? प्रकाशन
भारत विकणे आहेअनुवादितमेहता प्रकाशन
मध्यरात्रीचा स्वातंत्र्यसूर्य? प्रकाशन
मारुती कारस्थानविश्वकर्मा प्रकाशन
युवराजनवचैतन्य प्रकाशन
रक्तरंगणकेसरी प्रकाशन
राजमाताराजहंस प्रकाशन
राजो फरिया आणि सईदअनुवादितपद्मगंधा प्रकाशन
रायबरेली व त्यानंतरविद्या प्रकाशन
वज्रप्रहारअभिजित प्रकाशन
वॉर्सा ते हिरोशिमामेहता प्रकाशन
वुइ दि नेशनअनुवादमेहता प्रकाशन
वुइ दि पीपलअनुवादमेहता प्रकाशन
व्होल्गा जेव्हा लाल होतेअभिजित प्रकाशन
श्रीशिवरायइंडिया बुक कंपनी प्रकाशन
संग्रामराजहंस प्रकाशन
सत्तावन्न ते सत्तेचाळीसअभिजित प्रकाशन
सत्तावन्न ते सत्तेचाळीस (लोकावृत्ती)अभिजित प्रकाशन
सातवे सोनेरी पानकुलस्वामिनी प्रकाशन
सावरकरऐतिहासिकअभिजित प्रकाशन
स्टॅलिनची मुलगीअभिजित प्रकाशन
स्वातंत्र्यवीर सावरकरऐतिहासिकनवचैतन्य प्रकाशन
स्वातंत्र्यसंग्राम : ज्ञात आणि अज्ञातनवचैतन्य प्रकाशन
स्वेतलानाइनामदार बंधू प्रकाशन
हिटलरमॅजेस्टिक प्रकाशन
हे नेते ’जनता’चे? प्रकाशन

वि.स. वाळिंबे यांच्यावर लिहिले गेलेले साहित्य

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b उमदा लेखक, उमदा माणूस. p. १३६.
  2. ^ a b उमदा लेखक, उमदा माणूस. p. ४.
  3. ^ a b c उमदा लेखक, उमदा माणूस. p. १२ - २१.

बाह्य दुवे