Jump to content

विनायकदादा पाटील

विनायकदादा पाटील (१९ ऑगस्ट, १९४३:निफाड तालुका - २३ ऑक्टोबर, २०२०:नाशिक) हे काँग्रेस पक्षाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री होते. भारतातील सहकारी वनशेतीचे ते जनक मानले जातात.[] पाटील यांनी वनविकासासाठी केलेले कार्य पाहून ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांनी त्यांना वनाधिपती ही पदवी दिली.[] ते साहित्यिक आणि वक्ते म्हणूनसुद्धा प्रसिद्ध होते.

राजकीय कारकीर्द

पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात कुंदेवाडीचे सरपंच म्हणून केली. पुढे ते निफाड तालुका पंचायत समिती सभापती, निफाडचे आमदार, विधान परिषद सदस्य झाले. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात त्यांनी उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा आणि युवकसेवा या खात्यांचे मंत्री म्हणून काम पाहिले. राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले महाराष्ट्र राज्य वनविकास मंडळाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे ते पाच वर्षे होते.  []

वनशेती

ज्या वनस्पतीपासून डीझेल निर्मिती करता येते, अशा जॅट्रोफा वनस्पतीची लागवड त्यांनी १९८६ मध्ये केली. तसेच या वनस्पतीपासून प्रायोगिक तत्त्वावर डीझेलही तयार केले.  

पुस्तके

पाटील यांनी लिहिलेली काही पुस्तके:

  • यशोधन []
  • निलगिरीची शेती []
  • एक्केचाळीस वृक्ष
  • ऑईल ग्लूम टू ऑईल ब्लूम
  • जॅट्रोफा २००३
  • गेले लिहायचे राहून - राज्य शासनाचा अनंत काणेकर पुरस्कार[][]

पुरस्कार

  • महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार[]
  • महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण पुरस्कार[]
  • भारत सरकारचा इंदिरा प्रियदर्शनी पुरस्कार[]
  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि शेती संघटनेचा ‘आऊटस्टँडिंग ट्री फार्मर ऑफ इंडिया’ पुरस्कार[]
  • जमनालाल बजाज पुरस्कार[]
  • जिनिव्हा येथील रोलेक्स पुरस्कार मिळवणारे एकमेव भारतीय  []

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b c d e "Vinayak Dada Patil: ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील कालवश; करोनाला मात दिल्यानंतर मृत्यूने गाठले". Maharashtra Times. 2020-10-26 रोजी पाहिले.
  2. ^ दातार, बा वा (2002). दोन तात्या: तात्या (राव) सावरकर, तात्या (राव) शिरवाडकर. अक्षरमुद्रा प्रकाशन.
  3. ^ a b c d e "ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांचे निधन; सरपंच ते मंत्री असा राजकीय प्रवास". Loksatta. 2020-10-24. 2020-10-26 रोजी पाहिले.
  4. ^ "Gele Lihayache Rahoon". राजहंस प्रकाशन (इंग्रजी भाषेत). 2020-10-26 रोजी पाहिले.
  5. ^ "विनायकदादांना काणेकर पुरस्कार". Maharashtra Times. 2020-10-26 रोजी पाहिले.