विनय कोरे
विनय विलासराव कोरे | |
महाराष्ट्र विधानसभा सदस्य | |
विद्यमान | |
पदग्रहण इ.स. २००९ | |
मतदारसंघ | शाहूवाडी |
---|---|
राजकीय पक्ष | जनसुराज्य |
विनय कोरे हे मराठी राजकारणी आहेत. यांनी जनसुराज्य पक्षाची स्थापना केली. या पक्षाकडून ते महाराष्ट्राच्या १२व्या आणि १४व्या विधानसभेवर निवडून गेले.
ऑक्टोबर २००९ च्या शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात राज्याचे अपारंपरिक ऊर्जामंत्री व जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांनी ८३११ मताधिक्याने विजय मिळविला. त्यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी शिवसेना आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांचा पराभव केला. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार कर्णसिंह गायकवाड हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. [१]
संदर्भ
- ^ सकाळ पेपर मधील बातमी[मृत दुवा]