Jump to content

विनय आपटे

विनय आपटे
जन्म १७ जून १९५१[ संदर्भ हवा ]
मृत्यू ७ डिसेंबर, इ.स. २०१३
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, दिग्दर्शन
भाषामराठी
प्रमुख नाटके मी नथुराम गोडसे बोलतोय
प्रमुख टीव्ही कार्यक्रमवहिनीसाहेब, दुर्वा, एका लग्नाची दुसरी गोष्ट
पत्नी वैजयंती आपटे

विनय आपटे (१७ जून, इ.स. १९५१[ संदर्भ हवा ] - ७ डिसेंबर, इ.स. २०१३) हे मराठी अभिनेते, नाट्यनिर्माते व दिग्दर्शक होते. मराठी नाटके, चित्रपट, दूरचित्रवाहिनी मालिका तसेच हिंदी चित्रपट व मालिकांमधून यांनी अभिनय केला. यांनी दिग्दर्शित केलेले मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक विषयावरून उठलेल्या वादंगांमुळे लक्षणीय ठरले.

विनय आपटे यांनी भूमिका केलेली किंवा त्यांचे दिग्दर्शन असलेली नाटके

  • अँटिगनी
  • अफलातून
  • अभिनेत्री
  • आय लव्ह यू
  • कुसुम मनोहर लेले
  • घनदाट
  • डॅडी
  • मित्राची गोष्ट
  • मी नथूराम गोडसे बोलतोय
  • रानभूल
  • शुभ बोले तो नारायण

मृत्यू

छातीत दुखत असल्याच्या कारणामुळे विनय आपटे यांना ७ डिसेंबर, इ.स. २०१३ रोजी अंधेरी, मुंबई येथील कोकिलाबेन अंबाणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच रात्री भाप्रवे १९:३० च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला []. मृत्युसमयी ते ६२ वर्षांचे होते.

संदर्भ व नोंदी

  1. ^ "विनय आपटे यांचे निधन". ८ डिसेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील विनय आपटे चे पान (इंग्लिश मजकूर)