विद्युत विस्थापन क्षेत्र
भौतिकीत विद्युत विस्थापन क्षेत्र, हे मॅक्सवेलच्या समीकरणांत आढळणारे एक सदिश क्षेत्र परिमाण असून ते ने दर्शविले जाते. हे द्रव्यातील मुक्त प्रभाराचे परिणाम परिमाणात धरते. "डिस्प्लेस्मेंट" (म्हणजेच "विस्थापन") ह्या अर्थाने "D" वापरलेला आहे. मुक्त अवकाशात विद्युत विस्थापन क्षेत्र हे प्रवाह घनते इतकेच असते.
व्याख्या
पराविद्युत द्रव्यात विद्युत क्षेत्र Eच्या प्रभावाखाली द्रव्यातील (आण्विक केंद्र आणि त्यांचे विद्युत्कण) बंदिस्त प्रभार हे स्थानिक विद्युत द्विध्रूव जोरासहित काहीसे लांब होतात. विद्युत विस्थापन क्षेत्राची व्याख्या अशी:
येथे ही अवकाश पारगम्यता (किंवा मुक्त अवकाशाची पारगम्यता), आणि P हे (स्थूलमानाने) ध्रुवीकरण घनता म्हणजेच कायमस्वरूपी आणि प्रस्थापित विद्युत द्विध्रुव जोराची घनता.