Jump to content

विदर्भ साहित्य संमेलन

ही साहित्य संमेलने नागपूर येथील विदर्भ साहित्य संघ भरवतो. या संघाच्या गावोगावी शाखा आहेत. त्यांची गोंडवण शाखा (चंद्रपूर शहरातील शाखा) इ.स. १९५४साली स्थापन झाली.

कै.प्रा.द.सा.बोरकरांनी लाखनी(भंडारा जिल्हा) येथे विदर्भ साहित्य संघाची एक शाखा स्थापन केली आहे. १३ आणि १४ जानेवारी १९२३ रोजी अमरावती येथे दादासाहेब खापर्डे यांच्या पुढाकाराने विदर्भातील पहिले साहित्य संमेलन भरविण्यात आले. खापर्डे यांनी तेव्हा आताचा विदर्भ, मराठवाडा, हैदराबाद आणि मध्य भारत येथील रसिकांना आमंत्रित केले होते. त्यामुळे ग्वाल्हेर ते छिंदवाडा अशा विविध हिंदी राज्यातील मराठीभाषक या संमेलनासाठी अमरावतीत एकत्र आले होते. या संमेलनाच्या अखेरच्या दिवशी, १४ जानेवारी रोजी खापर्डे यांनी विदर्भ साहित्य संघाची स्थापना करण्याची घोषणा केली. या नव्या संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून हैदराबादचे न्या. केशवराव कोरटकर यांना बहुमान देण्यात आला. स्वतः खापर्डे यांच्याकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी होती. संस्थेचे नाव ‘विदर्भ साहित्य संघ’ असले तरी त्यात मराठवाडा आणि मध्य भारताचा मोठा भूप्रदेश सामावला होता.

विदर्भ साहित्य संघाची संमेलने व संमेलनाध्यक्ष[]

संमेलनदिनांकस्थळअध्यक्ष
1ले,जानेवारी 1923अमरावतीश्री. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
2रे,19 एप्रिल 1924अमरावतीश्री. यादव माधव काळे
3रे,17 जानेवारी 1926यवतमाळश्री. नरसिंह चिंतामण केळकर
4थे,10 जून 1927हैद्राबादभारताचार्य श्री. वि.वि. वैद्य
5वे,25 नोव्हेंबर 1928जळगावश्री. केशवराव कोरटकर
6वे1929नागपूरश्री. दादासाहेब खापर्डे
7वे,21 ऑगस्ट 1937अमरावतीश्री. न. र. फाटक
8वे,31 मार्च 1945आकोटडॉ. य. खु. देशपांडे
9वे,23 डिसेंबर 1945दर्यापूरश्री. श्री. ना. बनहट्टी
10वे,25 डिसेंबर 1946पुसदश्री. पु. य. देशपांडे
11वे,3 नोव्हेंबर 1948गोंदियाश्री. डॉ. वि.भि. कोलते
12वे,2 फेब्रुवारी 1950चंद्रपूरडॉ. मा. गो देशमुख
13वे,28 एप्रिल 1951अकोलाश्री. ग. त्र्यं. माडखोलकर
14वे,3 मे 1952जबलपूरप्रा. सौ. कुसुमावती देशपांडे
15वे,14 मार्च 1953मोझरीडॉ. शं. दा. पेंडसे
16वे,25 डिसेंबर 1953खामगांवश्री. भ. श्री. पंडित
17वे,19 फेब्रुवारी 1955नागपूरश्री. बाबासाहेब खापर्डे
18वे,25 डिसेंबर 1955तुमसरश्री. बाबासाहेब खापर्डे
19वे,27 जानेवारी 1957गोंदियाश्री. पुरुषोत्तम दिवाकर ढवळे
20वे,1 फेब्रुवारी 1958यवतमाळश्री. आ. रा. देशपांडे
21वे,15 मार्च 1959तळोधीश्री. या. मु. पाठक
22वे,3 फेब्रुवारी 1960सावरगावडुकरेश्री. ना. रा. शेंडे
23वे,29 एप्रिल 1961नागपूरश्री. अण्णासाहेब खापर्डे
24वे,30 डिसेंबर 1961वाशीमश्री. बाळशास्त्री हरदास
25वे,26 डिसेंबर 1964पुसदप्रा. वामन कृष्ण चोरघडे
26वे,17 सप्टेंबर 1966काटोलडॉ. अ. ना. देशपांडे
27वे,25 नोव्हेंबर 1967वर्धाश्री. पु. भा. भावे
28वे,14 फेब्रुवारी 1969आर्वीश्री. शंकरराव सुरडकर
29वे,25 डिसेंबर 1970वणीश्री. पांडुरंग श्रावण गोरे
30वे,19 नोव्हेंबर 1972सोमनाथश्री. विश्राम बेडेकर
31वे,8 मार्च 1975उमरखेडप्रा. शरच्चंद्र टोंगो
32वे,6 फेब्रुवारी 1976अचलपूरडॉ. मधुकर आष्टीकर
33वे,4 जून 1978भंडाराप्राचार्य राम शेवाळकर
34वे,22 ऑक्टोबर 1983वरोराडॉ. गंगाधर पानतावणे
35वे,25 फेब्रुवारी 1984मेहकरश्री. ना. घ. देशपांडे
36वे,20 ऑक्टोबर 1984अहेरीश्रीमती गीता साने
37वे,24 ऑक्टोबर 1985घाटंजीप्रा. मधुकर केचे
38वे,25 एप्रिल 1986बुलडाणाडॉ. द. भि. कुळकर्णी
39वे,26 डिसेंबर 1987गडचिरोलीश्री. सुरेश भट
40वे,31 मार्च 1989पुसद डॉ. उषा देशमुख
41वे,31 मार्च 1990चंद्रपूरप्रा. मो. दा. देशमुख
42वे,8 फेब्रुवारी 1991अकोलाश्री. द. ग. गोडसे
43वे,26 ऑक्टोबर 1991लाखनीडॉ. भाऊ मांडवकर
44वे,10 जानेवारी 1992मूलश्री. उद्धव शेळके
45वे,28 नोव्हेंबर 1993कारंजा (लाड)प्रा. विठ्ठल वाघ
46वे,4 मार्च 1994वरूडडॉ. सुरेश डोळके
47वे,7 जानेवारी 1995आंभोराश्री. मनोहर तल्हार
48वे,9 फेब्रुवारी 1996दर्यापूरडॉ. श्रीधर शनवारे
49वे,7 नोव्हेंबर 1997यवतमाळश्री. बाबा. मोहोड
50वे,15 जानेवारी 1999नागपूरश्री. राजेंद्र बनहट्टी
51वे,11 फेब्रुवारी 2000उमरखेडमारोती चितमपल्ली
52वे,3 फेब्रुवारी 2001धामणगांव (रेल्वे)प्रा. प्रभा गणोरकर
53वे,1 फेब्रुवारी 2002नागपूरडॉ. मधुकर वाकोडे
54वे,12 डिसेंबर 2003लाखनीश्री. वामन निंबाळकर
55वे,21 जानेवारी 2005आकोटप्रा. वसंत आबाजी डहाके
56वे,2 नोव्हेंबर 2007नरखेडनामदेव चं. कांबळे
57वे,8 फेब्रुवारी 2008मलकापूरडॉ. आशा सावदेकर
58वे,10 डिसेंबर 2008धानोराबाबाराव मुसळे
59वे,4 डिसेंबर 2009चंद्रपूरन्या. चंद्रशेखर धर्माधिकारी
60वे,28 जानेवारी 2011वर्धाडॉ. ज्योती लांजेवार
61वे,24 डिसेंबर 2011वाशीमप्रा. नारायण कुळकर्णी-कवठेकर
62वे,7 डिसेंबर 2012गोंदियाडॉ. किशोर सानप
63वे21 फेब्रुवारी २०१३आर्णीश्री. शंकर बडे
64वे12 डिसेंबर 2014तळोधी (बाळापूर)डॉ. अक्षयकुमार काळे
65वे29 जानेवारी 2016चंद्रपूरडॉ. सदानंद देशमुख
66वे9 जानेवारी 2018वणीडॉ. शिरीष गोपाळ देशपांडे
67 वे29-30 ऑक्टोबर 2021हिंगणाडॉ. म. रा. जोशी
६८१६, १७, १८ डिसेंबर २०२२चंद्रपूरवि. स. जोग

विदर्भात भरणारी आणखी काही साहित्य संमेलने

अंकुर साहित्य संमेलन

हे संमेलन अंकुर साहित्य संघ भरवतो. विदर्भाबाहेर खानदेशातही अंकुर साहित्य संमेलने झालेली अहेत. या संघाने भरवलेले ४७वे अंकुर साहित्य संमेलन २३-१-२०११ रोजी अकोट (जिल्हा अकोला) येथे झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.शंकर राऊत होते. पूर्वीच्या आणि नंतरच्या संमेलनांसाठी अंकुर साहित्य संमेलन हा लेख पहा.

वऱ्हाडी साहित्य संमेलन

अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन (आयोजक - अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच)

  • पहिले संमेलन  दिनांक  29 एप्रील 2018 स्थळ पार्थसारथी शुक्ल मंगल कार्यालय अकोला

संमेलनाचे अध्यक्ष - मा. पुष्पराज गावंडे, स्वागताध्यक्ष  मा.ऊमेश मसने, उद्घाटक मा.प्रकाश पोहरे, प्रमुख पावने मा.तुकाराम बिरकड, मा.श्रीकांतदादा पीसे , मा.शिरीषभाऊ धोत्रे , मा.सुरेश पाचकवडे, मा.अशोक पटोकार

  • दुसरे संमेलन   2 व 3 जून 2019, मराठा मंगल कार्यालय, अकोला संमेलनाचे अध्यक्ष प्रकाश पोहरे स्वागताध्यक्ष डॉ.धनंजय दातार, उद्घाटक विठ्ठल वाघ, प्रमुख पावने  हर्षवर्धन देशमुख, डॉ.रणजीत सपकाळ, संदीप भारंबे, डॉ. श्रीकांत तिडके, मा.ऋषिकेश पोहरे , डॉ.मोना चिमोटे, दिनकर दाभाडे, सौ. वंदना दातार, सौ. साधना पोहरे, पुष्पराज गावंडे, श्याम ठक, चित्रपट अभिनेता भारत गणेशपुरे, आणि अभिनेता अमीत्रियान पाटील
  •   तिसरे संमेलन 4 जाने. 2020,  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती . संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र इंगळे, स्वागताध्यक्ष डॉ.मुरलीधर चांदेकर (कुलगुरू, सं.गा.अम.विद्यापीठ अमरावती ), उद्घाटक  मधुकर वाकोडे, प्रमुख पावने - शिरीष धोत्रे , संदिप भारंबे, सौ.अनुराधा धामोडे, पुष्पराज गावंडे , प्रा.सदाशिव शेळके, डाॅ.मोना चिमोटे, श्याम ठक, डॉ.राजेश जयपुरकर
  • नियोजित चौथे संमेलन डिसेंबर २०२२ संमेलनाचे अध्यक्ष प्रा डॉ राजेश मिरगे, स्वागताध्यक्ष विनायक भारंबे, उद्घाटक : ना. राजेंद्र शिंगणे (मंत्री महाराष्ट्र राज्य) कार्याध्यक्ष नितीन वरणकार, प्रतापराव जाधव खासदार, आकाश फुंडकर, शकुंतला बुच नगराध्यक्ष शेगाव, पुष्पराज गावंडे, प्रकाश पोहरे

१३वे कामगार साहित्य संमेलन, अमरावती, २०-२१ जानेवारी २००६

  • राज्यस्तरीय कृषि साहित्य संमेलन:

हे संमेलन प्रतिभा साहित्य संघ ही संस्था भरवते. असले संमेलन अकोट(जिल्हा अकोला) येथे १३-१-२०११ला भरले होते.

  • विदर्भ जिल्हा साहित्य संमेलन:
  • १७-१८ जानेवारी १९८७
  • झाडीपट्टी परिवर्तनशील साहित्य संमेलन:
  • १ले : येरंडी(तालुका अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया); २३-३-२०१२
  • झाडीपट्टी साहित्य संमेलन:
  • १ले : रेंगेपार(कोहळी)(तालुका लाखनी, जिल्हा भंडारा);१९ जानेवारी १९९२ रोजी रेंगेपार (कोहळी) या गावी झाडीबोली साहित्य मंडळाच्या ध्वजाखाली पहिले झाडीबोली साहित्य संमेलन झाले.
  • ?वे : सेंदूरवाफा; १९९५ संमेलनाध्यक्ष कै.प्रा.द.सा.बोरकर

आजतागायत (इ.स.२०१२) शासकीय मदतीशिवाय झाडीबोली साहित्य मंडळाने अठरा साहित्य संमेलने घेतली आहेत.

पद्मगंध साहित्य संमेलन
  • अखिल भारतीय पद्मगंध साहित्य संमेलन, सावनेर (जिल्हा [[नागपूर[[) येथे झाले होते.
प्रज्ञासूर्य साहित्य संमेलन
बहुजन साहित्य संमेलन
  • १ले :
  • २रे : वरुड(जिल्हा अमरावती); २४-२५ फेब्रुवारी १९९६; संमेलनाध्यक्ष प्रा.या.बा. वडस्कर
बाल साहित्य संमेलन
  • बालसाहित्य संमेलन, नागपूर. हे मुलांनी मुलांसाठी भरवलेले संमेलन होते.
  • विदर्भ साहित्य संघाचे बालसाहित्य संमेलन, बुलढाणा.
  • रतन टाटा ट्रस्टचे बालविविधा संमेलन, नागपूर
बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन
  • बुलढाणा, ३-१-२०१०, संमेलनाध्यक्ष ज.ह. खरात
महात्मा फुले साहित्य संमेलन
  • २रे : अमरावती; २६-५-२०१२; संमेलनाध्यक्ष प्रा.अरविंद माळी
विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय लेखिका संमेलन
  • ?वे : नागपूर, ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर २०१३, संमेलनाध्यक्षा कवयित्री नीरजा
विदर्भ युवक संमेलन
  • १ले : भद्रावती (जिल्हा चंद्रपूर); तारीख ?; संमेलनाध्यक्ष सुधाकर गायधनी
राज्यस्तरीय स्त्रीशक्ती साहित्य संमेलन

?वे : चंद्रपूर, २०/२१ एप्रिल २०१३, संमेलनाध्यक्षा डॉ. प्रतिमा इंगोले

हे सुद्धा पहा

  • मराठी साहित्य संमेलने
  1. ^ "संमेलने". vssnagpur.org. 2023-02-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.