Jump to content

विटा

  ?विटा

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१७° १६′ १५.९६″ N, ७४° ३२′ १६.०८″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हासांगली
तालुका/केखानापूर taluka
लोकसंख्या४५,००० (२००८)
नगराध्यक्ष्यप्रतिभा

पाटील

कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• 415311
• +०२३४७
• MH १० (सांगली)

विटा तथा विटे हे शहर महाराष्ट्राच्या दक्षिणेला वसलेले आहे. विट्याची लोकसंख्या ४५,००० च्या आसपास आहे.

मुख्य भाषा मराठी असून हिंदी आणि इंग्रजी भाषाही येथे बोलल्या जातात.

नाव

विटे (सुवर्ण नगरी)

इतिहास

सांगली जिल्ह्यातील विटा हे शहर पुरातन कालीन आहे. शिवाजी महाराजांच्या सहाव्या पत्नी राणी सकवारबाई(गायकवाड घराणे)येथे वास्तव्यास होत्या. महाराजांच्या अंगरक्षकांपैकी एक कृष्णाजी गायकवाड हे राणीसाहेबांचे बंधू होते, सण १६५६/५७ साली राणी सकवारबाई यांचा विवाह शिवाजी माहाराज यांच्यासोबत झाला त्याना एक अपत्य झाले कन्या(कमळाबाई) महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी सती जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांना एक मुलगी असल्यामुळे सती जाऊ दिले नाही सण १७०७ साली त्यांचा मृत्यू झाला… विटा शहराच्या मध्यभागी राणीसाहेबांचा एक वाडा होता तो आता अस्तित्वात नाही, त्याच्या बाजूला चार तटबंद बुरूज होते, कालांतराने ते बुरूज पडले/पाडले गेले. त्यामधील एक बुरूज पाडून १९८३/८४ साली शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा ऊभारला गेला. दुसरा बुरूज हा मांगवाड्याला लागून होता. २०१६/१७ साली तो बुरूज पाडला व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक बांधण्यास बुरूजाची जागा वापरण्यात आलेली आहे. तिसरा एक बुरूज पडला/पाडला माहीत नाही, त्या जागी जुनी नगरपालीका बांधली होती ती पण पाडली गेली व त्या जागी व्यापारी संकुल (सभागृह)बांधले आहे, चौथा बुरूज पंचायत समीतीच्या मागील ऊजव्या बाजूस होता तो पडला आहे राणीच्या वाड्याला लागून प्यायच्या पाण्याची खुप मोठी विहीर होती सध्या ती अस्तीत्वात आहे पण त्यावर विटा बँक बांधली आहे. विटा शहरात काही मंदिरे जुनी आहेत त्यापैकी जुन्या गणपती मंदिरा मागे हेमाडपंथी शिव मंदिर आहे दसरा या सणाला येथे भव्य नेत्रदीपक असा ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा भरतो या शहराला सुवर्ण नगरी अस ही म्हणतात. हे शहर शांतताप्रिय आहे, हे महाराष्ट्रातील एकमेव असे ठिकाण आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्णाकृती पुतळे समोरासमोर आहेत.[ संदर्भ हवा ]

जनजीवन

तालुका स्तरावरची सर्वच कामे इथे होत असल्यामळें अनेक गावातील लोक या शहराशी जोडली गेली आहेत. त्यामुळे येथील लोक व बाहेरील लोक सर्वच गुण्यागोविंदाने राहतात. अनेक सण विविध रितीरिवाज प्रमाणे करण्याची इथे परंपरा आहे त्यामुळे येथील साजरे करण्यात येणारे सण हे मोठ्या थाटामाटात साजरे करतात.गौरी-गणपती या सणामध्ये एक वेगळा उस्ताह असतो. या शहराची अवती भोवती बरीचशी खेडोपाडी गावी असल्यामुळे हेच एक शहर खरेदीसाठी त्यांना एक उत्तम पर्याय आहे.शिवाय दुसरी शहरे हे खूप लांब पडतात. तसेच येथील दसऱ्याला होणारी पालखिंची शर्यत, नाथ या देवाची अष्टमी ही महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.येथील पालखी व अष्टमी बघण्यासाठी महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात.त्यावेळीसचा इथला माहोल बघण्या सारखा असतो. या शहरात विविध जाती धर्माची लोक राहतात.ते आपल्याला सण उत्सव मोठ्या थाटात साजरे करतात. या शहरात काही स्थायिक लोक आहेत ज्यांनी ह्या शहराची ओळख तशीच ठेवली आहे व बाहेरून आलेली काही लोक सुद्धा इथे येऊन चांगल्या प्रकारे स्थायी झालेली आहेत.तसेच हे शहर सुद्धा कोणी येथे येईल त्याला आपलस करून घेत. या शहरात गुन्हेगारीची प्रमाण अतिशय कमी प्रमाणत आहे तसेच हे शहर शांतताप्रिय देखील आहे.येथील लोक जीवनाचा,समजाचा ,राजकारणाचा,येथील कोणत्याही स्थायिक लोकांनां तसेच बाहेरून आलेल्या सामान्य लोकांना त्रास होत नाही. येथील लोकांनां खाण्याची व फिरण्याची खूप आवड आहे त्यामुळे हॉटेल्स,मॉल्स,कॅफे,तसेच कपड्यांची दुकाने जास्त पाहायला मिळतात. विटा ह्या शहराला गोल्डन सिटी म्हणून ओळखले जाते. कारण इथे सोन्याचांदीचे व्यापारपेठ मोठी आहे शिवाय अजून एक ऐतिहासिक कारण आहे. एकूणच पर्यावरण पूरक,समृद्ध अस हे एक शहर आहे.

शिक्षण

विटा येथे अभियांत्रिकी महाविद्यालय , फार्मसी महाविद्यालय, डि.एड,बी.एड महाविद्यालय आणि शास्त्र, कला आणि वाणिज्य महाविद्यालये आहेत. येथे मराठी, इंग्लिश आणि उर्दू भाषांमधून प्राथमिक माध्यमिक, ऊच्चमाध्यमिक शिक्षण उपलब्ध आहे.

बाह्य दुवे

  • विटे शहर गूगल नकाशावरील उपग्रह छायाचित्र