विजय हजारे
विजय हजारे भारत | ||
फलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने | |
गोलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने मध्यमगती | |
कसोटी | प्रथम श्रेणी | |
सामने | ३० | २३८ |
धावा | २१९२ | १८७४० |
फलंदाजीची सरासरी | ४७.६५ | ५८.३८ |
शतके/अर्धशतके | ७/९ | ६०/७३ |
सर्वोच्च धावसंख्या | १६४* | ३१६* |
चेंडू | २८४० | ३८६२८ |
बळी | २० | ५९५ |
गोलंदाजीची सरासरी | ६१.०० | २४.६१ |
एका डावात ५ बळी | - | २७ |
एका सामन्यात १० बळी | - | ३ |
सर्वोत्तम गोलंदाजी | ४/२९ | ८/९० |
झेल/यष्टीचीत | ११/- | १६६/- |
क.सा. पदार्पण: २२ जून, १९४६ |
भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा. |
मागील: लाला अमरनाथ | भारतीय क्रिकेट संघाचे नायक इ.स. १९५१ – इ.स. १९५२ | पुढील: लाला अमरनाथ |
मागील: लाला अमरनाथ | भारतीय क्रिकेट संघाचे नायक इ.स. १९५२ – इ.स. १९५३ | पुढील: विनू मांकड |
विजय हजारे यांचा जन्म मराठी कुटुंबात ११ मार्च १९१५ रोजी झाला. सांगलीतील शिक्षकाच्या आठ मुलांपैकी ते एक होते. हजारे यांचे क्रिकेट मध्ये आगमन होत असताना, त्यांना हिंदू जिमखान्याकडून क्रिकेट खेळण्यासाठी प्रस्ताव आला होता.
सुरुवातीस त्यांनी तो प्रस्ताव नाकारला होता. पण, त्यावेळचे क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष डी' मेलो यांनी त्यांची समजूत काढली आणि हजारे प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले.
हजारे हे उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करत असत.[१]
प्रथमश्रेणी क्रिकेट
प्रथमश्रेणी क्रिकेट मध्ये २३८ सामने ते खेळले. यामध्ये त्यांनी ५८.३८ च्या सरासरीने १८७४० धावांचा पाऊस पाडला. या प्रथमश्रेणी क्रिकेट मधील हा भारतीय धावांचा विक्रम प्रथम सुनील गावसकर आणि नंतर सचिन तेंडुलकर यांनी मोडला.
प्रथमश्रेणीत त्रिशतक करणारे हजारे हे पहिले भारतीय होते. त्यांनी 'द हिंदूज' विरुद्ध १९४३-१९४४ मध्ये ३०९ धावा ठोकल्या होत्या. यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ३१६ आहे. अशाप्रकारे त्यांनी प्रथमश्रेणी सामन्यात दोन त्रिशतके झळकावली.
प्रथमश्रेणीत ६० शतके आणि सलग तीन कसोटींमध्ये शतक नोंदवणारे ते पहिले भारतीय होते. त्यांनी गुल मोहंमद यांच्यासमवेत १९४७ मध्ये ५७७ धावांची भागीदारी केली होती.
ती भागीदारी २००६ मध्ये श्रीलंकेच्या कुमार संघकारा आणि महेला जयवर्धने यांनी साउथ आफ्रिकेविरुद्ध ६२४ धावा करून मोडली.
कसोटी क्रिकेट
कसोटी क्रिकेट खेळत असताना विजय हजारे यांनी ३० कसोटींमध्ये ४७.६५ च्या सरासरीने २१९२ धावा केल्या. यामध्ये त्यांची नाबाद १६४ ही सर्वोच्च धावसंख्या आहे. कसोटीमध्ये गोलंदाजी करताना त्यांनी ६१ च्या सरासरीने २० बळी घेतले. यामध्ये त्यांची ४/२९ ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे.
महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांची विकेट त्यांनी तब्बल तीनदा घेतली. त्यामुळेच कदाचित ब्रॅडमन हे हजारेंच्या मध्यमगती गोलंदाजी समोर खूप सावधानता बाळगायचे.
ब्रॅडमन यांच्यासाठी हजारे धोकादायक गोलंदाज होते. तसेच क्रिकेट रसिकांसाठी विजय हजारे हे मधल्या फळीतील अप्रतिम फलंदाज होते. कर्णधार नसताना हजारे यांनी अनेक प्रशंसनीय खेळ्या केल्या. यामध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात १९४७-४८ मध्ये एडिलेड कसोटीत दोन्ही डावात झळकावलेल्या शतकांचा समावेश आहे.
१९५१ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेसाठी हजारेंकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. त्यांनी दिल्लीतील पहिल्या कसोटी सामन्यामध्ये नाबाद १६४ धावांची दमदार खेळी केली. ही धावसंख्या त्यावेळी भारताकडून नोंदवलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. स्वतःचा विक्रम होण्यासाठी हजारेंनी डाव घोषित केला नाही, असाही आरोप त्यावेळेस त्यांच्यावर झाला.
परंतु, मुंबई मधील दुसऱ्या कसोटीतही त्यांनी १५५ धावांची धुंवाधार खेळी केली. भारतीय क्रिकेट मधील अनेक विक्रमांचे प्रणेते असलेल्या हजारेंनी कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत शतक झळकावण्याचा मानही पहिल्यांदा मिळवला.
विजय हजारे यांच्याच नेतृत्वाखाली भारताने पहिला कसोटी विजय मिळवला.
हजारे हे मितभाषी असल्यामुळे, भारताने पहिला कसोटी विजय मिळवल्यानंतरही ते आपल्या सहकारी खेळाडूंना फक्त 'शाब्बास' म्हणाले.
कसोटी क्रिकेटमधील विजय हजारे यांची कामगिरी पाहता त्यांचा सर्वोत्तम फलंदाजात समावेश होतो. मात्र नेतृत्व केलेल्या १४ पैकी १२ कसोटीत त्यांना धावांसाठी झगडावं लागलं. त्या १२ कसोटी सामन्यात त्यांनी २४.४२ च्या सरासरीने ५५५ धावाच केल्या.
तेव्हापासून कर्णधार पदाचे दडपण त्यांच्या कामगिरीवर परिणाम पाडत असल्याचे क्रिकेट पंडित मानू लागले. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्या पूर्वी भारतीय क्रिकेट मध्ये अनेक विक्रम करणारे हजारे हे पहिले भारतीय होते. त्यामुळे त्यांना आद्य भारतीय विक्रमादित्य असेच म्हणावे लागेल.[२]
महान क्रिकेट खेळाडू सर डॉन ब्रॅडमन आणि विजय मर्चंट यांचे विजय हजारे यांच्या बद्दलचे उदगार
सर डॉन ब्रॅडमन सांगतात, "विजय हजारे जर कर्णधार झाले नसते तर त्यांची गणना जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांमध्ये केली गेली असती."
विजय मर्चंट सांगतात, "कर्णधार पदाने विजय हजारेंना महान फलंदाज होऊ दिले नाही."
पद्मश्री किताब मिळवणारे पहिले भारतीय क्रिकेट खेळाडू विजय हजारे यांची इनिंग कर्करोगाच्या दीर्घ आजारानंतर १८ डिसेंबर २००४ रोजी वडोदरा येथे संपली.[३]
संदर्भ
- ^ Kalkhaire, Mayur (2020-08-20). "महान व्यक्तींची माहिती". All Best Thoughts (इंग्रजी भाषेत). 2020-08-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-24 रोजी पाहिले.
- ^ "महान क्रिकेट खेळाडू आद्य विक्रमादित्य - विजय हजारे". All Best Thoughts (इंग्रजी भाषेत). 2020-08-20. 2020-09-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-30 रोजी पाहिले.
- ^ Kalkhaire, Mayur (2020-08-20). "महान व्यक्तींची माहिती". All Best Thoughts (इंग्रजी भाषेत). 2020-08-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-24 रोजी पाहिले.