Jump to content

विजय साळसकर

विजय साळसकर
मृत्यू २६ नोवेंबर २००८
मुंबई , महाराष्ट्र , भारत
मृत्यूचे कारण दहशतवादी हल्ला
राष्ट्रीयत्वभारत ध्वज भारत
वांशिकत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण एम. कॉम.
प्रशिक्षणसंस्था मुंबई विद्यापीठ
पेशा पोलिससेवा
कार्यकाळइ.स. १९८३ - इ.स. २००८
धर्महिंदू
जोडीदार स्मिता साळसकर
आई हेमंता साळसकर
पुरस्कार अशोक चक्र(२००९)

विजय साळस्कर हे मुंबई पोलिसांमध्ये काम करणारे ज्येष्ठ पोलीस अधिकारी व सामना विशेषज्ञ होते. त्यांना ७५-८० गुन्हेगारांना - जे जास्त करून अरुण गवळी टोळीतील होते यांना मारण्यासाठी विशेष श्रेय दिले जाते.

आधीचे आयुष्य

विजय साळसकर यांचा जन्म मराठा कुळात झाला आहे. त्यांचे शिक्षण वाणिज्य ह्या क्षेत्रात मुंबई विद्यापीठातून झाले आहे. सब इन्स्पेक्टर ह्या पदवी खाली ते मुंबई पोलीस मध्ये १९८३ साली रुजू झाले. इंडिया टुडे ह्या मासिका मध्ये असे लिहिले आहे की साळसकर ह्यांनी त्यांचा पहिला एनकाउनटर रुजू झाल्याच्या पहिल्याच वर्षी केला असून त्यांनी राजा शहाबुद्दीन ह्याला मारलं. अनेक वर्ष फक्त पोलीस इन्स्पेक्टर म्हणून निवडक लोकांना माहित असलेले साळसकर हे गुटखा अंडरवर्ल्ड याच्या विरोधात काम करताना पुढे आले. त्यांच्या २४ वर्षांच्या कामगिरीत त्यांनी अनेक गुन्हेगारांना शौर्याने पकडले. सालास्कारांच्या गोळ्यांचे शिकार बनलेल्या काहींपैकी अमर नाईक, जग्गू शेट्टी, साधू शेट्टी, कुंदन सिंघ रावत, झहूर माखंदा यांसारखे गुंड शामिल होते.

मृत्यू

विजय साळसकर हे २६ नोव्हेंबर २००८ साली मुंबई मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झाले. कॉन्स्टेबल अर्जुन जाधव, जे विजय साळसकर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे यांबरोबर त्यांच्या मृत्युच्या वेळी होते, त्यांनी इंडिया एक्स्प्रेस मध्ये विधान दिले. ते तीन ऑफिसर आणि चार कॉन्स्टेबल ह्यांना माहिती मिळाली होती कि सदानंद दाते हे आतंकवाद्यांशी झुंज करताना जखमी झाले होते व ते स्त्रियांसाठी व छोट्या मुलांसाठी असलेल्या कामा अंड अल्बेस हॉस्पिटल मध्ये होते.बातमी मिळाली तेव्हा हे सगळे हॉस्पिटल पासून १० मिनिट दूर असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे होते. त्यांनी टोयोटा क़ुअलिस ही गाडी घेतली आणि निघाले.साळसकर गाडी चालवत होते, अशोक कामटे त्यांचा बाजूच्या सीटवर बसले होते व बाकीचे मागे बसले होते. जाधावान्प्रमाणे ५ मिनिटानंतर झाडाच्या मागून २ आतंकवादी आले व त्यांचावर गोळ्या घालायला सुरुवात केली.जाधव सोडून बाकी ६ पोलीस ऑफिसर मारले गेले.जखमी लोकांना मदत करणारे कोणीच नव्हते. दोन्ही आतंकवाद्यांनी तिन्ही पोलिसांचे मृतदेह रस्त्यावर टाकले आणि मेट्रो जंक्शन कडे निघाले.

बाह्य दुवे