Jump to content

विजय देव


प्राचार्य डाॅ. विजय प्रल्हाद देव (जन्म : इ.स. १९४१; - ११ एप्रिल २०१९) हे राज्यशास्त्राचे ३५ वर्षे प्राध्यापक होते. ते पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे दोनवेळा प्राचार्य झाले होते. ते लेखकही होते. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, दुर्गसंपदा अशा विविध विषयांवर त्यांनी लेखन केले. पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळ, विद्वत् सभा, विद्यापीठाची अधिसभा आदींचे ते सदस्य होते.

ते गो.नी. दांडेकर (गोनीदा) यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या जाहीर वाचनाचा कार्यक्रम आयोजित करीत असत. मृण्मयी प्रकाशन संस्थेचे ते संचालक होते.

दुर्गभ्रमण

प्रा. डाॅ. विजय देव हे गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाचे ते संस्थापक-अध्यक्ष होते. या मंडळातर्फे दरवर्षी दुर्ग साहित्य संमेलनासह दुर्ग जागरणाचे विविध उपक्रम त्यांनी राबविले. विजय देव हे योगविद्येचे पुरस्कर्ते होते. या कलेच्या प्रसारासाठी त्यांनी मोठे काम केले, एक पुस्तकही लिहिले.

कौटुंबिक

विजय देव हे गो.नी. दांडेकराचे जावई, लेखिका वीणा देव यांचे पती आणि अभिनेत्री मृणाल देव यांचे वडील होत.

विजय देव यांनी लिहिलेली पुस्तके

  • आत्मानुभूती (आत्मचिंतन)
  • आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत
  • आमचा योग वर्ग
  • कौटिल्याच्या यथार्थ तुलनेत मॅकिएव्हेली (वैचारिक)
  • दुर्गचिंतन (संपादित)
  • दुर्गायात्रा (संपादित)
  • पाश्चात्त्य राजकीय विचारवंत (सहलेखक - डॉ. संज्योत आपटे, डॉ. शरद गोसावी)
  • राजकीय विश्लेषण कोश
  • राजकीय संकल्पना आणि सिद्धान्त (सहलेखक - डॉ. संज्योत आपटे, डॉ. शरद गोसावी)
  • राज्यजिज्ञासा (स्पर्धा परीक्षेसाठी क्रमिक पुस्तक)
  • श्रीशिवछत्रपती : एक स्मरण
  • सुबोध राज्यशास्त्र (क्रमिक पुस्तक)


  • हृदयपालट (कादंबरी)