Jump to content

विजय कुमार सिंह

जनरल विजय कुमार सिंह ( १० मे १९५१) हे भारतीय लष्कराचे माजी लष्करप्रमुख आहेत. ते मार्च ३१, इ.स. २०१० ते ३१ मे, इ.स. २०१२ दरम्यान भारतीय भूदलाचे २६वे भारतीय भूदलप्रमुख होते. बिक्रम सिंग हे भारताचे नवे लष्करप्रमुख आहेत.

विजय कुमार सिंह ह्यांचा जन्म हरियाणा राज्यातील भिवानी जिल्ह्यातील बापोरा गावी झाला. जनरल विजय कुमार सिंह हे प्रहार या नाना पाटेकर यांच्या चित्रपटात दिसून आले होते.