Jump to content

विजया राजाध्यक्ष

विजया राजाध्यक्ष

डॉ. विजया राजाध्यक्ष (५ ऑगस्ट इ.स. १९३३ - हयात) या मराठी भाषेतील स्त्रीवादी लेखिका व समीक्षक आहेत. त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात व एस.एन.डी.टी. विद्यापीठात मराठीचे अध्यापन केले आहे. मराठी समीक्षक आणि लेखक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे त्यांचे पती होते.

विजया राजाध्यक्ष महाविद्यालयात असताना त्यांची पहिली कथा स्त्री मासिकातून प्रसिद्ध झाली. अधांतर हा त्यांचा पहिला संग्रह होता. त्यानंतर ‘विदेही’, ‘अनोळखी’, ‘अकल्पित’, ‘हुंकार’, ‘अखेरचे पर्व’, ‘उत्तरार्ध’, ‘आधी...नंतर’ असे त्यांचे एकूण १९ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. विजयाबाईंची कथा प्रामुख्याने मध्यमवर्गीय परिवेशातील स्त्रीजीवन चित्रित करण्यावर भर देते. विशिष्ट कालखंडातील प्रश्नांपेक्षा जन्म व मृत्यू या टोकांतील जीवनाचे प्रयोजन, स्त्री-पुरुषांची आणि आई-मूल, पती-पत्‍नी अशी कौटुंबिक नाती आणि त्यांनी जीवनाला दिलेला अर्थ, यांचा परोपरीने वेध घेणारी त्यांची कथा विशिष्ट मूल्यभाव व्यक्त करते. तरल, काव्यात्म शैलीने त्यांची कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. समीक्षात्मक लेखनात ‘कवितारती’, ‘जिव्हार’ ‘स्वानंदाचे आदिमाया’, ‘करंदीकरांचे समग्र लघुनिबंध’, ‘संवाद’ ही पुस्तके प्रख्यात आहेत. ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’ या ग्रंथाला साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरविले आहे. इ.स. २००० मध्ये इंदूर येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी भूषविले आहे.

प्रकाशित साहित्य

समीक्षा

  • आहे मनोहर तरी ... वाचन आणि विवेचन (संपादक : विजया राजाध्यक्ष आणि श्री.पु. भागवत)
  • करंदीकरांचे समग्र लघुनिबंध
  • कवितारती
  • काही वाटा काही वळणं (ललितलेखन समीक्षा)
  • किती वाटा किती वळणं (कादंबरी समीक्षा)
  • जिव्हार
  • पुन्हा मर्ढेकर
  • प्रभाकर पाध्ये: वाङ्मयदर्शन
  • बहुपेडी विंदा (चरित्र-आत्मचरित्र समीक्षा)
  • बहुपेडी विंदा खंड २ (दलित साहित्य समीक्षा)
  • मराठी कादंबरी आस्वादयात्रा
  • 'मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ
  • वाङ्मयीन पत्रव्यवहार
  • वेचक - विजया राजाध्यक्ष
  • वेध कवितेचा
  • शोध मर्ढेकरांचा
  • संवाद
  • स्वानंदाचे आदिमाया

कथा संग्रह

  • अकल्पित
  • अखेरचे पर्व
  • अधांतर
  • अनोळखी
  • अन्वयार्थ
  • आधी...नंतर
  • उत्तरार्ध
  • कमान
  • चैतन्याचे ऊन
  • जास्वंद
  • दोनच रंग
  • पांगारा
  • विदेही
  • समांतर कथा
  • हुंकार

निबंध

  • अनुबंध
  • तळ्यात...मळ्यात

कादंबरी

  • उत्तरार्ध

नाटक

  • जानकी देसाईचे प्रश्न

बालसाहित्य

  • कदंब

संपादित

  • आदिमाया (सहसंपादक: विंदा करंदीकर)

इतर

  • प्रबंधसार
  • मराठी वाडमयकोश खंड चौथा
  • साहित्यः अध्यापन आणि प्रकार

पुरस्कार

  • साहित्य अकादमी पुरस्कार "मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ" साठी १९९३
  • कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार (पुरस्कार प्रदानाची तारीख २७ फेब्रुवारी २०१७)

गौरव

  • अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन (इंदूर, २००१)

संदर्भ

बाह्य दुवे