विचार
विचार करणे म्हणजे विशिष्ट तऱ्हेने बुद्धीची पावले टाकणे.[१]
व्यूत्पत्ती
‘चर’ म्हणजे चालणे, वि+चर म्हणजे विशिष्ट तऱ्हेने चालणे. ‘चर’चे ‘चार’ हे प्रयोजक रूप आहे. चार म्हणजे चालविणे. बुद्धीला किंवा मनाला काही नियमांनुसार ‘चालविणे’ म्हणजे विचार करणे.[१] "पुर्वानुभवाच्या मदतिने व्यक्तिच्या मनातल्या मनात होणारी प्रक्रिया म्हनजे विचार होय". विचार प्रक्रिया;-(THINKING PROCESS) - विचार ही मानवि मनाचि प्रक्रिया आहे.डोळ्यासमोर नसलेल्या कोणत्याहि गोष्टिबद्दल चालु असलेल्या मानसिक प्रक्रियेला आपण विचार म्हणतो. मनुष्य हा विचारशील प्राणी आहे यामुळेच मनुष्य प्राणी आणि मानावेत्तर प्राणी यांचेमध्ये फरक दिसून येतो .मानवाला विचार करता येत असल्यामुळेच आज प्रगती करू शकला .विचारप्रक्रीयेमुळेच आजचा मानव चिंतनशील ,विचारशील बनला आहे.मानवाच्या प्रगल्भतेमुळे याष्याची शिखरे गाठतो आहे. म्हणूनच विचार म्हणजे काय ,विचार प्रक्रिया कशी चालते हे पाहणे महत्त्वाचे ठरते .
व्याख्या - व्यक्तीच्या पुर्वानुभवाच्या विविध अंगानी मनातल्या मनात जुळवाजुळव करण्याची प्रक्रिया म्हणजे विचार होय'.
विचारांचे प्रकार ;
-१)सृजनशिल विचार ; ज्या विचारामध्ये नाविन्यपूर्णता असते त्यास सृजनशिल विचार म्हणतात.
२)आत्मकेंद्रित विचार
३)वास्तविक विचार
स्थितिज्ञान, निष्कर्ष, आणि मते
मनुष्य हा विचारशील प्राणी आहे यामुळेच मनुष्य प्राणी आणि मानावेत्तर प्राणी यांचेमध्ये फरक दिसून येतो .मानवाला विचार करता येत असल्यामुळेच आज प्रगती करू शकला .विचारप्रक्रीयेमुळेच आजचा मानव चिंतनशील ,विचारशील बनला आहे.मानवाच्या प्रगल्भतेमुळे याष्याची शिखरे गाठतो आहे. म्हणूनच विचार म्हणजे काय ,विचार प्रक्रिया कशी चालते हे पाहणे महत्त्वाचे ठरते . व्याख्या - व्यक्तीच्या पुर्वानुभवाच्या विविध अंगानी मनातल्या मनात जुळवाजुळव करण्याची प्रक्रिया म्हणजे विचार होय'.
विचारांचे प्रकार ;
१)सृजनशिल विचार ; ज्या विचारामध्ये नाविन्यपूर्णता असते त्यास सृजनशिल विचार म्हणतात.
२)आत्मकेंद्रित विचार
३)वास्तविक विचार
आपणा माणसांचे सगळे विचार स्थितिज्ञान निष्कर्ष, आणि मते ह्या त्रिकूटाच्या मिश्रणांमधून तयार होत असतात, आणि कालौघात ते बदलतही असतात.
निरीक्षण/मापन/पॄथक्करण ह्या त्रिकूटावर आधारलेल्या सर्वसंमत शास्त्रीय पद्धती वापरून कोणत्याही विषयासंबंधी जमवलेली माहिती ते त्या विषयीचे स्थितिज्ञान. पर्यायी कुठल्याही स्थितिज्ञानाचा अचूकपणा कोणतीही असामी त्या शास्त्रीय पद्धती वापरून केव्हाही स्वतंत्रपणे तपासू शकते. (ह्यासंबंधी अधिक विवरण खाली परिशिष्टात दिले आहे.) कोणत्याही विषयासंबंधीच्या स्थितिज्ञानातून आपण माणसे पुष्कळदा काहीना काही निष्कर्ष काढत असतो. कोणी माणसाने काढलेले कोणतेही निष्कर्ष तात्त्विकपणॆ बरोबर असतील किंवा अजाणतेपणी चुकीचे असतील. स्थितिज्ञानातून तात्त्विकपणॆ बरोबर काढलेले निष्कर्ष "स्थितिज्ञान" ह्या गटातच घालता येतात.
आपणा माणसांची मते गुंतागुंतीच्या, पण मूलतः दोन तऱ्हांनी तयार होत असतात आणि काही वेळा बदलत असतात. त्या दोन मूळ तऱ्हा अशा :
(१) ज्या कोणा इसमांना आपण कोणत्याना कोणत्या कारणाने अधिकारी किंवा जाणकार मानत आसतो त्यांची किंवा आपल्या अवतीभोवतीच्या बहुसंख्य माणसांची जी काही मते असतील ती मते आपण पुष्कळदा आत्मसात करत असतो.
(२) आपली काही मते कुठल्याही तात्त्विक बैठकीवर नसून केवळ अंतर्ज्ञानाधारित असतात.
आपणा माणसांची काही काही मते जवळजवळ जगद्व्यापी रित्या समान असतात. उदाहरणार्थ समुद्रावर दिसणारा सूर्यास्त जवळजवळ जगद्व्यापी रित्या सगळ्या माणसांच्या मनात सुखदभावना निर्माण करतो, आणि मग आपण जवळजवळ सगळी माणसे सूर्यास्त अतिमनोहर असल्याचे विधान करत असतो. पण सूर्यास्त अतिमनोहर "असल्या"चे आपले विधान हे स्थितिवर्णन नसून केवळ एक मतप्रतिपादन असते. (उदाहरणार्थ समजा खूप मोठ्या दुःखात बुडलेल्या एकाद्या माणसाची नजर जर सूर्यास्ताकडे गेली तर त्या वेळी त्या माणसाला सूर्यास्त मनोहर न भासण्याची अगदी शक्यता आहे.) कोणत्याही परिस्थितीसंबंधी आपल्या मनातल्या प्रतिक्रिया ह्या स्थितिवर्णने नसून केवळ आपली मतप्रतिपादने असतात. पण "बहुतेक सगळ्या माणसांना सूर्यास्त मनोहर भासत असतो" हे विधान स्थितिवर्णनात्मक ठरेल, कारण त्या विधानाची सत्यता संख्याशास्त्राच्या तत्त्वांनुसार काही लोकांची तत्संबंधी मते जमा करून ठरवणे सहज शक्य आहे.
वरच्या परिच्छेदातल्या विचारांच्या किंचित विस्ताराकरता आणखी एक उदाहरण असे. : "मला खूप आनंद वाटत आहे" अशा तऱ्हांची आपल्या अंतर्मनासंबंधित विधाने माणसे करत असतात. पण तीही स्थितिवर्णनात्मक भासली तरी तशी नसून केवळ मतप्रतिपादनात्मक असतात. कारण माणसांच्या अंतर्मनातल्या भावनांचे शास्त्रीय मोजमाप कोणी दुसऱ्याने किंवा स्वतः करायची विद्या माणसाला आजमितीला अवगत नाही. "तू खूप आनंदात दिसत आहेस" हे विधानही स्थितिवर्णनात्मक भासले तरी अंशतः मतप्रतिपादनात्मक आहे. बोलणारी व्यक्ती प्रामाणिक असल्याचे धरून चालले तर "मला तू (अमुक भावना अनुभवत असल्याचे) दिसत आहेस "हा त्या वक्तव्यातला भाग थोडासा स्थितिवर्णनात्मक ठरेल, पण "तू खूप आनंदात दिसत असल्याचा" भाग मतप्रतिपादनात्मक आहे. मागच्या वाक्यात थोडासा स्थितिवर्णनात्मक असे म्हणण्याचे कारण असे की आपल्याला काय "दिसत आहे" ह्या गोष्टीचे आत्मनिरीक्षणही सरतेशेवटी "शास्त्रीय मोजमाप" वापरून आपल्याला कुठे करता येते? आपली सगळी मते आणि बरोबर/चूक निष्कर्ष ह्या गोष्टी वास्तविक स्थितिवर्णने असल्याची चुकीची कल्पना बहुतांश माणसे आपल्या मनात बाळगत असतात. ह्या वस्तुस्थितीमुळे जगात बराच लहानमोठा अनर्थ निर्माण होत असतो.
परिशिष्टे :
(१) "निरीक्षण/मापन/पॄथक्करण ह्या त्रिकूटावर आधारलेल्या सर्वसंमत शास्त्रीय पद्धती वापरून कोणत्याही विषयासंबंधी जमवलेली माहिती ते त्या विषयीचे स्थितिज्ञान. पर्यायी कुठल्याही स्थितिज्ञानाचा अचूकपणा कोणतीही असामी त्या शास्त्रीय पद्धती वापरून केव्हाही स्वतंत्रपणे तपासू शकते." अशी दोन विधाने वर दुसऱ्या परिच्छेदात आहेत. पण कॊणत्याही बाबीसंबंधी तशा तपासण्या करून स्थितिज्ञान प्राप्त करून घेणे हे बहुतेक सर्व जणांच्या आवक्याबाहेरचे असते, कारण निरीक्षण/मापन/पॄथक्करण ह्यांकरता लागणारा मोकळा वेळ, तंत्रज्ञान, आणि साधने ह्या सगळ्या गोष्टी अगदी मोजक्या माणसांना उपलब्ध असतात. ह्या वस्तुस्थितीमुळे आपणा बहुतेक माणसांना अनिवार्यतः कॊणाना कोणा दुसऱ्यांच्या सचोटीवर आणि जाणकारीवर विश्वास ठेवून त्यांनी पुरवलेली माहिती स्थितिज्ञानात्मक आहे असे धरून चालत रहावे लागते. आपण विश्वास ठेवलेली सगळी माणसे वस्तुतः पूर्ण सचोटीची आणि त्याहून मुख्य म्हणजे पूर्ण जाणकार असतील किंवा नसतील. उघडपणे आपण विश्वास ठेवलेल्या माणसांसंबंधी आपल्याला जे अनुभव येत रहातील त्यांनुसार आपला त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढतो किंवा कमी होतो. सचोटी आणि जाणकारी ह्या दोन बाबीत माणसांचा एकमेकांवरचा बऱ्यापैकी विश्वास समाजचालनेला अत्यावश्यक आहे. पण त्या दोन बाबींच्या वाणीच्या वस्तुस्थितीपायी लोकांबाबतचे तारतम्य ही गोष्ट आयुष्यात खूप महत्त्वाची ठरते. वरच्या स्थितीचे एक मुख्य उदाहरण म्हणजे जगातल्या राजकीय, आर्थिक, आणि सामाजिक घटनांबाबत स्थितिज्ञान मिळवण्याकरता आपण माणसे वृत्तपत्रांवर आणि दूरदर्शनातल्या वृत्तकथनांवर विश्वास ठेवत असतो. पण काही काही वृत्तपत्रे आणि दूरदर्शनसंस्था बातम्या देताना बातम्यांमधे जाणूनबुजून किंवा अजाणतेपणी आपल्या मतांचेही कमीजास्त मिश्रण करत असतात.
(२) काही वेळा काही माणसे काही विधाने करताना आपण केवळ स्थितिज्ञान प्रकट करत आहोत हे जोरकसपणॆ सांगण्याकरता "वस्तुस्थिती अशी आहे की..." अशा तऱ्हेचे शब्द वापरत असतात. पण कोणी तसे म्हणले तरी त्या असामीचे ते विधान वस्तुस्थितीनिदर्शक असेल किंवा नसेलही.
वैचारिकता आणि अवैचारिकता
मनुष्य हा विचारशील प्राणी आहे यामुळेच मनुष्य प्राणी आणि मानावेत्तर प्राणी यांचेमध्ये फरक दिसून येतो .मानवाला विचार करता येत असल्यामुळेच आज प्रगती करू शकला .विचारप्रक्रीयेमुळेच आजचा मानव चिंतनशील ,विचारशील बनला आहे.मानवाच्या प्रगल्भतेमुळे याष्याची शिखरे गाठतो आहे. म्हणूनच विचार म्हणजे काय ,विचार प्रक्रिया कशी चालते हे पाहणे महत्त्वाचे ठरते . प्रत्येक व्यक्तिच्या विचारांमधे थोडीबहुत अवैचारिकता असते, आणि त्या गोष्टीची आपणा बहुतेकांना जाणीव नसते. विशेषतः दुसऱ्या कोणी आणि विशेषतः कोणी राजकारणी लोकांनी व्यक्त केलेल्या कोणत्याही विचारांमधे वैचारिकता/अवैचारिकता किती आहे? हे आपण डोळसपणे नेहमी अजमावत रहाणे इष्ट आहे. विचारांमधल्या अवैचारिकतेची मुख्य रूपे अशी :
- काहीतरी मुद्द्याच्या समर्थनाकरिता कुठल्यातरी वरकरणी "सारख्याच" भासणाऱ्या आणि दुसऱ्यांना नीट माहीत असलेल्या घटनेचा/गोष्टीचा निर्देश करून त्या निर्देशाच्या आधारावर मुद्द्याच्या घटनेचे/गोष्टीचे वरकरणी "तात्त्विक" समर्थन करणे: पुष्कळदा ही समर्थनाची अतात्त्विक पद्धत लोक अजाणतेपणी वापरत असतात, तर काही वेळा (मुख्यतः राजकारणी माणसे) भोळसर श्रोत्यांची जाणूनबुजून दिशाभूल करण्याकरिता. दोन भिन्न गोष्टींमधे काही बाबतीत साम्य असले तर "म्हणून" इतर कुठल्या बाबतीत त्यांच्यात साम्य असणारच ह्या विचारात तर्कशुद्धता शून्य आहे.
- "अमुक एक घटना घडल्यानंतर अमुक दुसरी घटना घडली" ह्या वस्तुस्थितीच्या जोरावर पहिली घटना दुसऱ्या घटनेकरता कारणीभूत आहे हे विचित्र समर्थन करणे : पहिली घटना दुसऱ्या घटनेकरता (पूर्णतः किंवा काही अंशी) कारणीभूत आहे की नाही हे वास्तविक संबंधित माहिती मिळवून मग ठरवले पाहिजे.
- "हे" किंवा "ते" असे फक्त दोन पर्याय दुसऱ्यांपुढे (किंवा स्वतःपुढे) मांडणे : पुष्कळदा आयुष्यातले प्रश्न सोडवण्याकरता दोनांहून अधिक पर्याय असतात, किंवा दोन वा अधिक पर्यायांच्या कुठल्यातरी मिश्रणाचेही पर्याय असतात.
- आपल्या मुद्द्याला फक्त टेकू देणाऱ्या गोष्टी उल्लेखून टेकू न देणाऱ्या गोष्टी धूर्तपणे अनुल्लेखित ठेवणे. दूरदर्शनवर ज्या जाहिराती असतात त्यांपैकी काहींमधे जाहिरातनिर्माते कुठल्यातरी प्रसिद्ध खेळाडूंची/नटनटींची चित्रणॆ दाखवून त्यांच्या तोंडी विकायच्या गोष्टींच्या शिफारसी घालत असतात.
- कुठल्यातरी फक्त थोड्या घटना विचारात घेऊन त्याच्या जोरावर काहीतरी व्यापक विधान करणे. (ह्या अगदी खूप मर्यादित पद्धतीला इंग्रजीत induction अशी संज्ञा आहे.)
- "खूप", "प्रचंड", "त्रिकाळी", अशा तऱ्हांची अतिरेकी विशेषणे/क्रियाविशेषणे वापरणे.
- श्रोत्याच्या/श्रोत्यांच्या भावनांना आवाहन करणे : श्रोत्यांच्या भोळसटपणाचा फायदा घेऊन ह्या धूर्त पद्धतीचा वापर राजकारणी माणसे विशेषतः निवडणुकींपूर्वी सदानकदा करत असतात.
- कुठलेतरी सुभाषित किंवा कुठल्यातरी प्रसिद्ध खेळाडूचे/नटनटीचे वगैरे काहीतरी विधान "त्रिकालाबाधित सत्य" असल्यासारखे उद्धृत करणे : जगातल्या बहुतेक सगळ्या मुख्य भाषांमधे हरतऱ्हेची परस्परविरोधी सुभाषिते असतात आणि पुष्कळ सुभाषितांमधे अनुप्रासांसारखे भाषालंकार समाविष्ट असतात. केवळ त्या भाषालंकारांमुळे उद्धृत केलेली सुभाषिते खूप खोल असल्यासारखे माणसांच्या मनाला दिशाभूलीने भासत असते. प्रसिद्ध खेळाडूचे/नटनटीचे प्राविण्य वास्तविक मर्यादित असते आपापल्या क्षेत्रापुरते. एखादा अतिबुद्धिमान शास्त्रज्ञही आपल्या बुद्धीची चमक आपल्या क्षेत्रापलिकडॆ दाखवू शकेलच असे नाही, मग प्रसिद्ध खेळाडू/नटनटींची तर गोष्टच सोडा. नाटकातली/सिनेंमातली काही काही गाणी त्यांच्या चालींमुळे किंवा त्यांच्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण शब्दरचनांमुळे फार लोकप्रिय होतात. पण सुंदर चाली आणि वैशिष्ट्यपूर्ण शब्दरचना निर्माण करण्याच्या माणसाच्या वरदानाचे त्याच्या सूज्ञतेशी काहीएक संबंध नाही हे लोकांनी नीट लक्षात ठेवणे अवश्य आहे.
परिशिष्टे :
(१) काही लेखक/वक्तॆ आपल्या लिखाणांमधे/भाषणांमधे "गहन" शब्दांच्या लांबलचक "साखळ्यां"ची वस्तुतः फारसा किंवा अजिबात अर्थ नसलेली वाक्ये रेलचेलीने रचत असतात. गंमत म्हणजे त्या "गहनते"पायीच ती लिखाणे/भाषणॆ बव्हंशी अनाकलनीय वाटल्याने सामान्य वाचकांना ती खरोखरच फार गहन आणि म्हणून आपल्या बुद्धीच्या झेपेपलिकडची असावीत असे वाटत असते.
(२) दूरदर्शनवर ज्या जाहिराती असतात त्यांपैकी काहींमधे जाहिरातनिर्माते कुठल्यातरी प्रसिद्ध खेळाडूंची/नटनटींची चित्रणॆ दाखवून त्यांच्या तोंडी विकायच्या गोष्टींच्या शिफारसी घालत असतात. विपुल पैशाच्या मोबदल्याकरता जाहिरातनिर्माते जे काही शब्द त्यांना पोपटपंचीकरता सांगतील ते आपले मनापासूनचे असल्याच्या आविर्भावाने ते खेळाडू/नट नट्या जाहिरातींमधे बेदरकारपणे सादर करत असतात. हा फसवाफसवीचा व्यापार चालतो त्याचे उघड कारण म्हणजे प्रेक्षकांमधे पुरेसे भोळसट लोक असतात.
स्वभावचित्रणे
"स्वभावचित्रण" ह्या गोष्टीवर थोडा प्रकाश पाडण्याच्या उद्देशाने प्रथम काही विशेषणांच्या जोड्यांची एक
यादी खाली दिली आहे:
- (१) स्पष्टवक्ता.........................................................बोलण्याबाबत पाचपोच नसलेला
- (२) साहसी..........................................................अविचारी/उतावीळ
- (३) निश्चयी..........................................................आडमुठा
- (४) संवेदनाक्षम....................................................हळवा
- (५) दुसऱ्यांवर विश्वास राखणारा.............................भोळसट
- (६) कामसू...........................................................रात्रंदिवस कामाखेरीज दुसरे काही न सुचणारा
- (७) काटकसरी.....................................................कंजूष
- (८) विचारी..........................................................निर्णय घेणे पुढे ढकलणारा
- (९) गंभीर...........................................................विनोदाचे वावडे असलेला
- (१०) द्रष्टा............................................................स्वप्ने पहाणारा
- (११) व्यवहारचतुर................................................आपमतलबी /स्वार्थि
- (१२) सावध..........................................................भित्रा
- (१३) तडाजोडीला तयार असणारा............................तत्त्वनिष्ठता नसलेला
- (१४) खंबीर..........................................................हृदयशून्य
- (१५) सावध..........................................................संशयी
- (१६) काळजी करत न बसणारा...............................बेफिकीर
- (१७) सढळ हाताचा...............................................उधळ्या
- (१८) झटपट निर्णय घेणारा...................................उतावीळ
- (१९) गमत्या......................................................पाचपोच नसलेला
- (२०) सद्यःस्थितीविषयी जागरूक.............................अदूरदर्शी
.....................................................
आता जरा वेगळ्या तऱ्हेने लिहिलेली वरचीच यादी अशी:
- (१) स्पष्टवक्ता......................................................बोलण्याबाबत पाचपोच नसलेला
- (११) व्यवहारचतुर................................................आपमतलबी
- (२) साहसी........................................................अविचारी/उतावीळ
- (१२) सावध........................................................भित्रा
- (३) निश्चयी........................................................आडमुठा
- (१३) तडाजोडीला तयार असणारा...........................तत्त्वनिष्ठता नसलेला
- (४) संवेदनाक्षम...................................................हळवा
- (१४) खंबीर.........................................................हृदयशून्य
- (५) दुसऱ्यांवर विश्वास राखणारा.............................भोळसट
- (१५) सावध.........................................................संशयी
- (६) कामसू..........................................................रात्रंदिवस कामाखेरीज दुसरे काही न सुचणारा
- (१६) काळजी करत न बसणारा.............................बेफिकीर
- (७) काटकसरी.....................................................कंजूष
- (१७) सढळ हाताचा.............................................उधळ्या
- (८) विचारी..........................................................निर्णय घेणे पुढे ढकलणारा
- (१८) झटपट निर्णय घेणारा....................................उतावीळ
- (९) गंभीर...........................................................विनोदाचे वावडे असलेला
- (१९) गमत्या.........................................................पाचपोच नसलेला
- (१०) द्रष्टा............................................................स्वप्ने पहाणारा
- (२०) सद्यःस्थितीविषयी जागरूक............................अदूरदर्शी
..............................................................................
काही निरीक्षणे:
(१) पहिल्या (आणि दुसऱ्या) यादीतल्या वीसांपैकी प्रत्येक ओळीत डावीकडे जी विशेषणे आहेत ती
चांगल्या अभिप्रायाची --अनुकूल-- आहेत; तर उजवीकडची सगळी वाईट/प्रतिकुल अभिप्रायाची
आहेत. पण गंमत म्हणजे जर आपण आपले लक्ष दुसऱ्या यादीतल्या डावीकडच्या
विशेषणांवर केंद्रित केले तर त्या यादीतल्या डावीकडच्या प्रत्येक जोडीतली विशेषणे परस्परविरोधी
असल्याचे दिसेल!
(२) पहिल्या (आणि दुसऱ्या) यादीतल्या सगळ्या वीस ओळी एक गोष्ट उघड करते ती अशी की माणसाचे पुष्कळ
"चांगले" गुण त्यांचा अतिरेक झाला म्हणजे "वाईट" ठरतात. (ह्या गोष्टीला अपवाद म्हणजे
दयाळूपणा, सहानुभूती, सत्यवचन, क्षमाशीलता, सहिष्णुता, मनाचा मोठेपणा, प्रामाणिकपणा,
अशा तऱ्हांचे दुसऱ्यांशी एकात्मता राखणारे गुण.) दुसऱ्या शब्दात, आपल्या विचारांमधे/कृतींमधे
अतिरेकाऐवजी समतोलपणा राखणे आयुष्यात महत्त्वाचे असते.
(३) स्वतःबद्दलची वाजवी चहा नसलेली माणसे सोडली तर इतर सगळ्या माणसांची मनःप्रवृत्ती
गमतीची असते ती अशी की जर कोणत्याही कारणाने कोणी इसम एखादे विशेषण आपल्या मनात
स्वतःला लावणार असेल तर तो वरच्या याद्यांमधल्या डावीकडच्या विशेषणांसारखे विशेषण स्वतःला लावेल
हे जवळजवळ ठरलेले आहे! त्या इसमाच्या अवतीभोवतीच्या माणसांचे मत मात्र वेगळे असण्याची
शक्यता असते! माणसातल्या निसर्गदत्त अहंभावाचा तो परिणाम असतो. पण त्या नैसर्गिक प्रवृत्तीला
विचारीपणाने आळा घालून स्वतःकडे दुसऱ्यांच्या डोळ्यांमधून पहायची सवयही माणूस लावून घेऊ शकतो.
(४) कोणा इसमाला कोणते विशेषण लावायचे ह्याबद्दल त्याला ओळखणाऱ्या माणसांमधे बऱ्यापैकी
एकमत असण्याची बरीच शक्यता असली तरी काही वेळा एकमत नसण्याचीही शक्यता असते.
माणसांची वागणूक वेगवेगळ्या परिस्थितींमधे वेगळी असते, आणि शिवाय सभोवतीच्या माणसांच्या
मनःप्रवृत्ती --आणि म्हणून प्रतिक्रिया--सुद्धा वेगवेगळ्या असतात, ह्या दोन गोष्टींमुळे तसे घडते.
त्यात भर म्हणजे कुठलीही भाषा कितीही समृद्ध असली तरी तिच्यातले विशेषणात्मक शब्द मर्यादितच
असतात. त्यामुळे दुसऱ्या माणसाचे स्वभाववर्णन करताना माणसे "अगदी", "जरासा" अशा तऱ्हांचे
मोघमपणा प्रदर्शित करणारे शब्द विशेषणांना जोडत असतात.
- काहीतरी मुद्द्याच्या समर्थनाकरिता कुठल्यातरी वरकरणी "सारख्याच" भासणाऱ्या आणि दुसऱ्यांना नीट माहीत असलेल्या घटनेचा/गोष्टीचा निर्देश करून त्या निर्देशाच्या आधारावर मुद्द्याच्या घटनेचे/गोष्टीचे वरकरणी "तात्त्विक" समर्थन करणे: पुष्कळदा ही समर्थनाची अतात्त्विक पद्धत लोक अजाणतेपणी वापरत असतात, तर काही वेळा (मुख्यतः राजकारणी माणसे) भोळसर श्रोत्यांची जाणूनबुजून दिशाभूल करण्याकरिता. दोन भिन्न गोष्टींमधे काही बाबतीत साम्य असले तर "म्हणून" इतर कुठल्या बाबतीत त्यांच्यात साम्य असणारच ह्या विचारात तर्कशुद्धता शून्य आहे.
संदर्भ आणि नोंदी
- ^ a b Google's cache of http://www.maharshivinod.org/node/130. It is a snapshot of the page as it appeared on 20 Feb 2010 15:18:55 GMT.