विक्री कौशल्य
वस्तूंच्या विक्री करण्यासाठी विक्रेत्याला पुढाकार घ्यावा लागतो या पुढाकाराच्या तंत्राला विक्री कौशल्य असे म्हंटले जाते. मोठ्या प्रमाणात विपणन करण्यासाठी योग्य माध्यम, उत्पादनाची जाहिरात, बाजारभावाचा अभ्यास, उत्पादनाची योग्य किंमत आणि कार्यपद्धतीची आखणी करावी लागते. तसेच आपल्या उत्पादनाचा इतर उत्पादनांशी तुलनात्मक अभ्यास करून ठेवावा लागतो. आपल्या उत्पादनाची प्रमुख वैशिष्ट्ये विचारत घ्यावी लागतात. याचबरोबर विक्री म्हणजे स्वतःची वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी संभाव्य ग्राहकाला उद्युक्त करणे.
काही बाबी
विक्री कौशल्य असण्यासाठी खालील बाबी महत्त्वाच्या आहेत.
- संभाव्य ग्राहकाची पूर्ण माहिती - ग्राहकवर्ग, त्याचे वय, भौगोलिक ठिकाण, सामाजिक आवडीनिवडी आणि गरजा
- ग्राहकांच्या गरजा काय आहेत हे ऐकून घेणे
- उत्पादनाच्या स्वरूपाविषयी अथवा सेवेचा दर्जा याबद्दल खात्री
- वितरण साखळीचा प्रामुख्याने विचार
वितरणाच्या बाबतीत ग्राहकाच्या मागणीचा आकार आणि स्वरूप, पुरवठ्याच्या शक्यता, विक्रीच्या उत्पादनाची किंमत, उत्पादकाला होणारा निव्वळ नफा आणि वितरकाला द्यावी लागणारी किंमत यांचे प्रमाण या गोष्टी महत्त्वपूर्ण असतात.