Jump to content

विक्रम मारवाह

विक्रम मारवाह( जन्म:४ जून, १९२५ - मृत्यू:६ नोव्हेंबर, २०१३) हे पद्मश्री पुरस्कारप्राप्तनागपूरच्या वैद्यकीय व्यवसायातील एक गणमान्य व्यक्तिमत्त्व होते. मृत्यूसमयी त्यांचे वय ८९ वर्षांचे होते. त्यांना सन २००२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

प्रारंभीचे जीवन

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जबलपूरला झाल्यावर ते नागपूरच्या विज्ञान महाविद्यालयात शिकले. त्यांनी कोलकाता येथून आर जी. कार मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी प्राप्त केली. त्यांनी आझाद हिंद फौजेसाठी डॉक्टर म्हणून आपली सेवा दिली. इंग्लंडमधून एफआरसीएस केल्यावर त्यांनी गरीब लोकांवर उपचार करण्यात आपले शिक्षण कामी लावले. ते नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये अधिष्ठाता या पदावरही होते. त्यांनी गरीब लोकांवर उपचारासाठी सुमारे १५० शिबिरे घेतली.[]

महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता.

त्यांचे पंजाबी,बंगाली, मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व होते.

लेखन

त्यांनी 'मां किसकी बिमार थी' या पुस्तकाचे लेखन केले.[]

संदर्भ

  1. ^ a b "पद्मश्री डॉ. विक्रम मारवाह कालवश". ७ नोव्हेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)