Jump to content

वाहन चालक परवाना

.

वाहन चालक परवाना

    वाहन धारक किंवा वाहन चालविणारा व्यक्ती हा वाहन चालविण्यास योग्य आहे.व त्याने तसे प्रशिक्षण घेतलेले आहे.हे वाहन चालक परवाना सुनिश्चित करते.वाहन अधिनियम १९८८ अन्वये सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यासाठी लायसेन्स आवश्यक असते. वाहन परवाना मध्ये  असे प्रकार पडतात.

१. मोटार सायकल ५० सी.सी.

२. मोटार सायकल विना गिअर.

३. मोटार सायकल विना गिअर सह.

४. लाईट मोटार व्हेईकल.

५. लाईट मोटार व्हेईकल नॉट ट्रान्सपोर्ट.

६. लाईट मोटार व्हेईकल ट्रान्सपोर्ट.

७. हेवी मोटार व्हेईकल                    

काही मह्त्वाच्या गोष्टी:-

• लर्नर्स लायसेन्स – सहा महिन्यांच्या मुदतीसाठी लायसेन्स.

• कायमस्वरूपी लायसेन्स – दीर्घ मुदतीचे लायसेन्स जे प्राप्त करण्यासाठी प्रथम लर्नर्स लायसेन्स आवश्यक असते.

• ड्राईव्हिंग लायसेन्स प्राप्त करण्यासाठी लर्नर्स लायसेन्स काढणे बंधनकारक आहे.

• विना गिअर ५० सी सीच्या वैयक्तिक वाहना करिता लायसेन्स प्राप्तीसाठी वयाची मर्यादा १६ वर्षे पूर्णची आहे.परंतु यासाठी चालकाला पालकांची परवानगीही आवश्यकता असते. तशी परवानगी मिळाल्यास १६ वर्षे पूर्ण असलेले व्यक्तीला वाहनचालक परवाना काढता येतो.

• वैयक्तिक वाहनचालक स्थायी / कायमस्वरूपाचा वाहनचालक परवाना प्राप्तीसाठी वयमर्यादा १८ वर्षे पूर्ण असावे.

• अवजड वाहनचालक परवाना प्राप्तीसाठी वय वर्षे २० पूर्ण व वाहनचालविन्याचे नियम व प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.

       वाहनचालक परवाना प्रकाराद्वारे वय पूर्ण आहे हे दर्शविण्यासाठी जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स सादर करावी लागते.त्याच प्रमाणे पासपोर्ट आकाराचे  रंगीत फोटो, निवासी/रहिवासी प्रमाणपत्र, व मेडिकल फिटनेस असल्याचे घोषणापत्र परवाना अर्ज करते वेळी जोडावे लागतात.       

     या कागदपत्राण बरोबर निश्चित केलेले शुल्क जमा केल्यास कागदपत्रांची सत्यता तपासून वाहनचालक परवानासाठी वाहन चालविण्याचे प्रात्यक्षिक व नियमांची माहिती अशी परीक्षा दिल्यानंतर लर्नर्स/तात्पुरता वाहनचालक परवाना दिला जातो.जर व्यक्ती प्रात्यक्षिक मध्ये नापास झाला तर त्याला पुन्हा परीक्षा देण्याची वेळ येते.

    तात्पुरता वाहनचालक परवाना प्राप्ती नंतर ३० ते १८० दिवसांच्या आत स्थायी वाहनचालक परवाना घ्यावा लागतो.त्यासाठी तात्पुरता वाहन परवाना व व्यक्ती ज्या वाहन परवान्यासाठी मागणी करते ते वाहन सोबत घेऊन परीक्षकांसमोर वाहन चालविणे नियमांची माहिती सांगणे या बाबी पूर्ण केल्यास स्थायी वाहन परवाना दिला जातो.ज्याची मुदत दीर्घ असते.