Jump to content

वासुदेव स्वामी

श्रीवासुदेव स्वामी समाधी ,कन्हेरी
शास्त्रीबुवांनी समर्थांचे शिष्यत्व स्वीकारले

मूळचे काशीचे प्रकांड पंडित असलेले सदाशिवशास्त्री येवलेकर शास्त्रार्थामध्ये विजय मिळवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आले होते .समर्थ रामदासांनी त्यांना शास्त्रार्थामध्ये पराभूत केल्यावर त्यांनी समर्थांचे शिष्यत्व स्वीकारले .हेच सदाशिवशास्त्री पुढे 'वासुदेव स्वामी' म्हणून प्रसिद्ध झाले.त्यांचा मठ व समाधी साताऱ्याजवळ 'कण्हेरी' येथे आहे .त्यांची पुण्यतिथी श्रावण शुद्ध तृतीया या दिवशी असते . काशी क्षेत्री सदाशिवशास्त्री येवलेकर या नावाचे विद्वान पंडित होते.त्यांचा वेद्शास्त्राचा गाढ अभ्यास होता.विद्वान म्हणून जसजशी त्यांची कीर्ती वाढू लागली,तसतसा त्यांच्या अहंकाराचा फुगा फुगू लागला.भारतभर हिंडून प्रत्येक प्रत्येक प्रांतातील विद्वान पंडितांशी वाद घालून जायपत्र मिळविण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला.अर्ध्याहून अधिक भारत पादाक्रांत केल्यावर त्यांच्या अहंकाराला आणखीनच धार चढली.त्यांचा आत्मविश्वास वाढला.त्यांना एक आज्ञाधारक शिष्यही मिळाला. त्या शिष्याच्या हातात २४ तास जळती मशाल असायची.तसेच सदाशिवशास्त्री लोकांना याचा अर्थ काळात नसे.तेव्हा सदाशिवशास्त्री सांगत, ' ज्या दिवशी माझा वादात पराभव होईल, त्या दिवशी ही मशाल विझेल आणि या सुरीने मी माझी जीभ कापून घेईन'. लोकांना त्यांच्याबद्दल आदरापेक्षा भीतीच जास्त वाटू लागली.पण शास्त्रीजींचे काहीतरी पूर्वसुकृत होते म्हणून त्यांची सामार्थांशी गाठ पडली. समार्थांशी वाद घालण्याकरिता ते चाफळला आले.समर्थांनी त्यांना वादापासून परावृत्त करण्याचा खूप पर्यंत केला. शेवटी समर्थांनी शास्त्रीबुवांची चांगलीच जिरवली. रस्त्यावरून चाललेल्या मोळीविक्याला त्यांनी हक मारली. समर्थांच्या नुसत्या कृपादृष्टीने मोळविक्याचे रुपरंग पालटले.एखाद्या पंडिताचे तेज त्याच्या चेहऱ्यावर झळकू लागले.त्या सर्व प्रकाराने शास्त्रीजी गाड्बगले.मोळीविक्याने पूर्वपक्ष मांडून वादाला प्रारंभ केला.तेव्हा शास्त्रीबुवांनी आपला पराभव होणार हे ओळखले त्यांनी मशाल विझवली.सुरीने ते जीभ कापून घेणार तेवढ्यात समर्थांनी त्यांना आवरले.समर्थ म्हणाले - 'आपले ज्ञान इतरांना वाटून सगळा समाज ज्ञानी करावा. वाद घालून, तुम्ही तुमच्या ज्ञानाचा दुरुपयोग करीत आहात.'यानंतर शास्त्रीजींचे पूर्ण जीवन बदलले