वाळू
वाळू हा दीर्घकालीन नैसर्गिक प्रक्रियेने तयार होणारा पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे खडकाच्या घर्षणातून बारीक बारीक तुकडे होण्याची प्रक्रिया नदीमध्ये सतत सुरू असते. वाळूच्या कणांचा आकार ०.०६२५ मिमी ते २ मिमी व्यास या दरम्यान असतो. वाळूचा समावेश भारतात 'गौण खनिज' या वर्गात केला जातो. याच्या वापरासाठी वेगवेगळे नियम व कायदे केले गेले आहेत.
वाळूचे प्रकार
- सिलिका वाळू
- क्वार्टझ वाळू
- चुनखडीयुक्त
- धातुयुक्त[१]
उपयोग
- शेती - माती बरोबरच वाळूचे प्रमाण काहि पिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. नर्सरी/रोप वाटिकेमध्ये वाळू वापरली जाते.
- बांधकाम - या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नदीतून उपसा करून वाळू वापरली जाते.
- उद्योग - फौंडरी या धातूउद्योग क्षेत्रात साचे उत्पादनातही विशिष्ठ प्रकारची वाळू वापरली जाते.
- काच व इतर तत्सम वस्तू
- वाळू शिल्पे