Jump to content

वाल्हे (पुरंदर)

  ?वाल्हे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरपुरंदर
जिल्हापुणे जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

वाल्हे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे.

"वाल्या कोळी ते वाल्मिकी ऋषी"

जेजुरी पासून जरा पुढे गेलं की वाल्हे गावात जरा थोडंसं आत महर्षी वाल्मिकी ऋषींचे समाधी स्थळ आहे...

येथे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहीत असलेल्या रामायणकार वाल्मिकी ऋषींनी समाधी घेतली आहे...याठिकाणी एक छानसं छोटंसं मंदिर आहे...

वाल्या कोळी ते वाल्मिकी ऋषी हा अदभुत प्रवास आपल्या सगळ्यांना माहीत आहेच...

ज्यांना कोणाला आयुष्यात आता सगळं संपलं , आता आपले सगळे मार्ग बंद आहेत असे नैराश्य आहे त्यांनी या गोष्टीचा आदर्श घ्यावा...

एक माणूस शून्यातून कसं प्रचंड मोठं विश्व निर्माण करू शकतो ही सकारात्मक बाब घेण्यासारखी आहे...

या मंदिराच्या बाजूला ज्या डोंगर रांगा आहेत त्यातल्याचं एका डोंगरावर वाल्याचे सात दगडी रांजण आहेत...

आता काळानुसार बरीच पाडझड झालीय पण ते अजूनही वाल्याचा वाल्मिकी कसा झाला याची साक्ष देत उभे आहेत...

तिथे जायला रस्ता नाही, चार पाच किमी पायवाट तुडवत उंच डोंगर चढत जावं लागतं...

या मंदिराच्या बाहेर पिंपळाचे झाड आहे, याचं ठिकाणी वाल्याने श्री नारद मुनींना एका अडवून त्यांना लुटायचा प्रयत्न केला आणि तेथेच नारद मुनींनी त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त करून दिले म्हणून त्या झाडाला पवित्र मानून ते पूजले जाते...

या मंदिरातील एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात वाल्या, महर्षी वाल्मिकी ऋषी ते रामायण अशी सगळी कथा पेंटिंगच्या रुपात भिंतीवर फ्रेमच्या माध्यमातून बघायला मिळते. या पेंटिंग इतक्या अप्रतिम आणि जिवंत वाटतात की तो प्रसंग प्रत्यक्षात समोर उभा आहे असे जाणवते. या चित्रकाराला खरोखरच मानाचा मुजरा...

जेजुरीला गेलात जरा वाट वाकडी करून या मंदिराला अवश्य भेट द्या. विशेषतः लहान मुलांना हे या पेंटिंग आणि कथा प्रत्यक्ष दाखल्यास आपसूकचं एक संस्कार त्यांच्यावर होईल आणि आपली संस्कृती आपला इतिहास पुढच्या पिढीत जाईल...

संधी प्रत्येकाला मिळतेचं आणि ती संधी योग्य वेळी ओळखून, त्या संधीचा यथायोग्य प्रकारे वापर करून  आपलं आयुष्य हे शून्यातून देवत्वापर्यंत कसे नेऊ शकतो याचं हे मूर्तिमंत आदर्श प्रतीक आहे...

( छायाचित्र : गुगलवरून )

भौगोलिक स्थान

हवामान

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासची गावे

जेजुरी - निरा - गुळुंचे - नावळी

कोळविहीरे - मांडकी


संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate