Jump to content

वाल्दापेन्यासची चकमक

वाल्दापेन्यासची चकमक ही चकमक १८०८ मध्ये झालेल्या स्पेनच्या बंडाचा एक भाग होती. नेपोलियनचे सैन्य आंदालुसियामध्ये शिरण्यासाठी वाल्दापेन्यास गावाजवळून जात असताना वाल्दापेन्यास आणि आसपासच्या गावांतील असैनिकी व्यक्तींनी त्यांच्याशी सशस्त्र लढत दिली. येथे अडकून पडलेले हे सैन्य बैलेनच्या लढाईत वेळी पोचू शकले नाही व त्याचे पर्यवसान स्पॅनिश विजयात झाले.