Jump to content

वारीच्या वाटेवर

वारीच्या वाटेवर ही एक महाकादंबरी आहे.[] अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव हे तिचे लेखक आहेत.[]

लेखन इतिहास

वारकरी संप्रदायातील मैलाचा दगड ठरावा अशी ही एकमेव महाकांदबरी श्री यादव यांनी पंधरा वर्षे संशोधन करून लिहिली आहे. दैनिक सकाळमध्ये बातमीदार व उपसंपादक या पदावर काम करीत असताना पंढरीच्या वारीचे वार्तांकन करण्यासाठी ते वारी चालू लागले. १९९५ पासून सुरू झालेल्या या वारीने वारकरी संप्रदायासाठी एक महाकादंबरी निर्माण झाली. वास्तवाचा वेध घेत मानवता मुल्याची जपणूक करणारी वारकरी धर्माचे महत्त्व या कादंबरीत वर्णन करण्यात आले आहे.[]

लेखक परिचय

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बहिशाल शिक्षणमंडळात ते व्याख्याता म्हणूनही काम करतात. पत्रकार, वक्ते, नाटककार, संपादक, कवी, लेखक, लावणीकार, गीतकार, समाजसुधारक असे असलेले यादव हे मूळचे माळशिरस भुलेश्वर ता. पुरंदर येथील आहेत.[]

हेतू

अंधश्रद्धा, विषमता, जातीभेद यांना बाजूला सारून मानवता धर्माचा जागर करीत समतेची पताका देशभर नेणारा हा संप्रदाय पुन्हा एकदा वारक-यांना कळावा, मूळ हेतू पासून भाविक दूर जाऊ नयेत. संत नामदेव, संत तुकाराम, संत गाडगेमहाराज यांना अभिप्रेत असणारा समाज यातूनच उभा राहिलअसे लेखकाला वाटते.[] त्यातूनच

विठ्ठलाने मला । आहे सांगितले।सत्य वारीतले। लिहायला।।

सांगुनिया गेले। ज्ञानदेव तुका।बोलियेला मुका। वारीमाजी।। अशा वास्तवादी अभंग रचना त्यांनी केल्या आहेत.

संदर्भ

  1. ^ a b "'वारीच्या वाटेवर' ही महाकादंबरी म्हणजे भागवत धर्माची बखर". Pudhari News. २५.६.२०१९. 2020-01-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७.१.२०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b पाटील, परशुराम (२५.६.२०१९). "वारी माणसाला जगायला शिकवते !". तरुण भारत. २७. १. २०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "दौंड परिसरात फाटक चित्रपटाचे चित्रीकरण संपन्न... दशरथ यादव यांची चौकटीबाहेरची प्रेमकथा". ३. १. २०२०. महाराष्ट्र भूमी. 2020-01-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)