Jump to content

वारली चित्रकला

महाराष्ट्रातील वारली चित्रशैलीतील एक चित्र

वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील कोकण विभागातील वारली या आदिवासी जमातीची वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली आहे.[]डहाणू आणि पालघर जिल्ह्यातील परिसरात राहणाऱ्या वारली जनजातींची ही चित्रे जगप्रसिद्ध झालेली आहेत.[]महाराष्ट्र राज्यातील लोकसंस्कृतीचे एक वैशिष्ट्य म्हणून या कलाप्रकाराकडे पाहिले जाते.

स्वरूप

वारली चित्र

गेरूने सारवलेल्या भिंतींवर तांदळाच्या पांढऱ्या पिठाने साधे व सुबक आकार रंगवण्याची पद्धत हे या चित्रशैलीचे वैशिष्ट्य समजले जाते.वारली समाजातील महिला शेतीचे हंगाम, सण उत्सव अशा प्रसंगी भिंतीवर वारली चित्रे काढतात.[]त्रिकोण,गोल आणि आयत या भौमितिक आकृृतींचा प्रामुख्याने वापर वारली चित्रकलेत केलेला पहायला मिळतो.[] तारपा हे पारंपरिक वाद्य वाजविणारा पुरूष मध्यभागी उभा असून त्याच्याभोवती गोलाकार रचनेत नृत्य करणारे स्री पुरूष अशी चित्रे वारली पद्धतीत विशेष करून आढळतात. याखेरीज वारली जनजातीच्या देवदेवता,शेती, घर,धान्याचे कोठार,पशु,पक्षी, विविध कामे करणारे स्री पुरूष,बैलगाडी अशी वारली जीवनाशी संबंधित चित्रे यामधे पहायला मिळतात.[] वारली जमातीत विवाह प्रसंगी विशेष प्रकारची चित्रे काढण्याची पद्धती रूढ असल्याचे दिसते. विवाह विधीचा महत्त्वाचा भाग म्हणून ही चित्रे शुभ मानली जातात.[]

जगभरात प्रसिद्ध

जिव्या सोमा म्हशे या वारली चित्रकाराने सदर कला जगभरात पोहोचविली आहे. म्हशे यांना या कलेसाठी भारत सरकारचा गौरव प्राप्त झाला आहे. त्यांच्याकडून ही कला शिकून अनेक नवनवीन वारली कलाकार आपली कला पोहोचवीत आहेत.कपडे,पिशव्या,भिंती,फुलदाणी,घरे अशा विविध ठिकाणी वारली चित्रकला जगभरात काढली जाते.

विशेष प्रसंगी सादरीकरण

वारली चित्रात मध्यभागी तारपा वादक आणि सभोवती नृत्य करणारे समूह

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त २०२२ साली प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिल्ली येथे वारली कलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण घडविले आहे. वारली लोकसंस्कृतीचा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा आधुनिक काळापर्यंतचा प्रवास या कलाकारांनी ५ भित्तीचित्रांच्या द्वारे घडविला आहे.[]

संदर्भ

  1. ^ Satyawadi, Sudha (2010). Unique Art of Warli Paintings (इंग्रजी भाषेत). D.K. Printworld. ISBN 978-81-246-0557-8.
  2. ^ Dandekar, Ajay (1998). Mythos and Logos of the Warlis: A Tribal Worldview (इंग्रजी भाषेत). Concept Publishing Company. ISBN 978-81-7022-692-5.
  3. ^ Desk, From : Entertainment. "Warli paintings – An impeccable Indian folk art form". www.cityspidey.com (इंग्रजी भाषेत). 2022-02-10 रोजी पाहिले.
  4. ^ Tribhuwan, Robin D.; Finkenauer, Maike (2003). Threads Together: A Comparative Study of Tribal and Pre-historic Rock Paintings (इंग्रजी भाषेत). Discovery Publishing House. ISBN 978-81-7141-644-8.
  5. ^ Mali, Santosh; Dhangada, Rajesh (2014-08-05). The Art of Warli Painting: The Step-by-step Guide and Introduction... (इंग्रजी भाषेत). Createspace Independent Pub. ISBN 978-1-5002-4410-1.
  6. ^ "वरली - भारतीय लोक कला". www.abhivyakti-hindi.org. 2022-02-10 रोजी पाहिले.
  7. ^ "Republic Day Parade 2022: Warli Art of Maharashtra To Be Proudly Displayed at R-Day in New Delhi | 📰 LatestLY". LatestLY (इंग्रजी भाषेत). 2022-01-24. 2022-02-10 रोजी पाहिले.