Jump to content

वारकरी साहित्य परिषद

वारकरी चळवळीतील संताच्या विचारांचा वसा व वारसा जतन करून या संत साहित्याचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य वारकरी मंडळीनी एकत्र येऊन करण्याचे योजिले व या विचाराने प्रेरित होऊन सन १९११ साली वारकरी साहित्य परिषद ही संस्था स्थापन झाली. या चळवळीचे उदिष्ट साध्य करण्याच्या हेतूने रचनात्मक भरीव कार्य म्हणून

  • पहिले अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन श्री क्षेत्र नाशिक येथे फेब्रुवारी २०१२ मध्ये संपन्न झाले.
  • दुसरे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन नवी मुंबई येथे फेब्रुवारी २०१३ मध्ये झाले.
  • तिसरे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन श्री क्षेत्र शेगांव येथे फेब्रुवारी २०१४ मध्ये झाले.
  • चौथे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन श्री क्षेत्र नांदेड येथे फेब्रुवारी २०१५ मध्ये झाले.
  • ५वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन पुणे येथे मे २०१६ मध्ये संपन्न झाले.
  • ६ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन मे २०१७ लातूर येथे संपन्न झाले.
  • ७ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन नाट्यपंढरी गोदिया येथे संपन्न झाले.
  • ८वे संमेलन कोल्हापूर येथे २८ ते ३० डिसेंबर २०१९ या कालावधीत झाले. : या संमेलनामध्ये राज्यातील संप्रदायाचे अभ्यासक, दिंडीकरी, फडकरी, कीर्तनकार व प्रवचनकार यांनी भाग घेतला. तसेच चर्चासत्रे, भजन, भारूड, कीर्तन इ. कार्यक्रम होत असतात. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात सांस्कृतिक महोत्सव घेण्यात आला. १४व्या शतकात संत चोखोबा मातीखाली गाडले गेले. आज त्यांच्या समाज बांधवानी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. त्यामुळे संत चोखोबांच्या अभंगांचे पारायण कोणीही करत नव्हते. अशा परिस्थितीत वारकरी साहित्य परिषदेने संत चोखोबांच्या अभंग गाथा पारायणास मंगळवेढा जि.सोलापूर येथे सन २०१३मध्ये थाटामाटाने सुरुवात केली.

संत तुकोबाराय समजावून घ्यावयाचे असतील तर त्यांच्या शिष्या संत बहिणाबाईचे अभंग समजून घेणे आवश्यक आहे. म्हणून डिसेंबर २०१४मध्ये संत बहिणाबाई अभंग गाथा पारायण सोहळा औरंगाबाद येथे घेण्यात आला. भारताचे पंतप्रधान.नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान आव्हानाला प्रतिसाद देऊन श्रीक्षेत्र पंढरपूर येथे ” झाडू संताचे मार्ग” या उपक्रमाद्वारे सन २०१५पासून वारकरी परिषद स्वच्छता अभियान राबवीत आहे. जानेवारी २०१६मध्ये ग्रंथ ज्ञानेश्वरीला ७२५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मराठवाडयातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातुन वारकरी साहित्य परिषदने मराठवाडयातील ८ जिल्ह्यातील ७६ तालुक्यामध्ये ‘ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी काढण्यात आली.

नोव्हेंबर २०१८ मध्ये मुंबईतील विधान भवनात स्वच्छतेचा महाजागर या विषयी सर्व वारकऱ्यासोबत भव्य कार्यक्रम घेण्यात आला. मे २०१८मध्ये ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचा महाराष्ट्र घडावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्यात आला. संतसाहित्यातील विचार जनमानसात, शाळा-महाविद्यालयांमध्ये पोहचावा यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या स्थापनेपासून वरीलप्रमाणे उपक्रम राबविले जात आहेत. प्रबोधनाची मोठी पंरपंरा असलेल्या कोल्हापूरमघ्ये झालेले हे संत साहित्य संमेलन यास लोक चळवळीचे स्वरूप देईल , असा संयोजकाचा दावा आहे.