वायवर्णा
वायवर्णा,वायवर्ण किंवा वायवरणा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिला मराठीत हदवर्णा वा हाडवर्णा असेही नाव आहे. अन्य नावे - संस्कृत : अश्मरिघ्न, त्रिपर्ण, बिल्वपत्र, वरुण, वरुणक, वरुणा; हिंदी - वरना, बार्णा, बिलियाना, वाखुन्ना; गुजराती - (वाय)वरणो, वार्णो; कानडी - बितुसी, नेरवेले; बंगाली - वरुणगाछ. इंग्रजी नाव - Three-leaved caper. शास्त्रीय नाव क्रटेव्हा नुर्वाला (Crataeva nurvala).
वरुणाचा लहान पानझडी वृक्ष असतो. पाने संयुक्त असून एक आड एक असतात. पर्णिका तीन व पान रुंद शंखाकृती असते. झाडाची फुले पांढरट मोठी व सुगंधी, आणि फळे गोल ३-४ सेंटिमीटर व्यासाची गुळगुळीत व पिवळी असतात. फळात अनेक बिया असतात.
हा वृक्ष भारतातील जवळजवळ सर्व राज्यांत नद्या नाल्यांच्या काठावर ओलसर व सावलीच्या जागी आढळतो. मुसलमानांच्या कबरीजवळ याची लागवड करतात. झाडाची मुतखड्यासह सर्व मूत्रविकारांवर रामबाण.वरून किंवा वायवर्णा वरून किंवा वायवर्णा हे झाड भरगच्च फुलांनी भरलेले झाड आहे. वर्षात दोन किंवा तीन वेळा पांढरट-पिवळट नाजूक फुलांच्या घोसांनी भरभरून फुलणार वायवर्णाच झाड फुलत ते एप्रिल महिन्याच्या बहरकाळात. आणि नंतर फळे येतात. टेबलटेनिसच्या चेंडू पेक्षाही जरा लहान पण तशीच वाटोळी, तुकतुकीत. आधी फिकट पांढरट हिरवी आणि पूर्ण पिकल्यावर रेशमी. ठेंगणाठुमका आटोपशीर असा वरून वृक्ष दक्षिणेत मलबार आणि कर्नाटकात दक्षिण कोकणात नैसर्गिकरीत्या वाढतो.हा वृक्ष शहरात मात्र सौंदर्यासाठी खास लावला गेला आहे. वरूनची कडू साल यकृत आणि मुत्रविकारांवर वापरली जाते. कुपचन निस्तरायला वरूनच्या पानांच्या फार उपयोग असतो.
संदर्भ
वृक्षराजी मुंबईची डॉ.मुग्धा कर्णिक